AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Road Rage CCTV : नोएडात चाललंय काय? आधी मॉलमध्ये मर्डर, आता भररस्त्यावर कार अंगावर घातली, घटना सीसीटीव्हीत कैद

दिवाकर हा नोएडातील सेक्टर 20 मध्ये राहणारा असून त्याचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आहे. दिवाकर हा त्याचे दोन मित्र हिमांशू अग्रवाल आणि महेंद्र गुलिया यांच्यासोबत ह्युंदाई वेन्यू कारने नोएडाहून सोनीपतला जात होते. महामाया उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या आय-20 कारने त्यांच्या कारला मागून धडक दिली. यात त्यांच्या कारला स्क्रॅच आली.

Road Rage CCTV : नोएडात चाललंय काय? आधी मॉलमध्ये मर्डर, आता भररस्त्यावर कार अंगावर घातली, घटना सीसीटीव्हीत कैद
नोएडात भररस्त्यावर कार अंगावर घातलीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 7:07 PM
Share

उत्तर प्रदेश : कारला ठोकर मारल्याच्या कारणातून भररस्त्यात एका तरुणाच्या अंगावर कार (Car) घातल्याची घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली आहे. घटनेनंतर कारमधील आरोपी पळून गेले. घटनेत तरुण गंभीर जखमी (Injured)  झाला असून त्याला कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाकर मोटवानी (28) असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपींची ओळख पटवली. याप्रकरणी सेक्टर 39 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. आरोपींची कारही जप्त करण्यात आली आहे. (In a brawl over a car crash in Noida, one youth crushed another, incident caught in cctv)

VIDEO : दिल्लीत पार्किंगवरून हत्या होण्याच्या अनेक घटना समोर येत असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओ नोएडाचा असून यात एक गाडी सरळ दुसऱ्यावर चढवल्याचे दिसत आहे.#Accident #Noida #Delhi pic.twitter.com/ZVfUvyLA6S

— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2022

काय आहे प्रकरण ?

दिवाकर हा नोएडातील सेक्टर 20 मध्ये राहणारा असून त्याचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आहे. दिवाकर हा त्याचे दोन मित्र हिमांशू अग्रवाल आणि महेंद्र गुलिया यांच्यासोबत ह्युंदाई वेन्यू कारने नोएडाहून सोनीपतला जात होते. महामाया उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या आय-20 कारने त्यांच्या कारला मागून धडक दिली. यात त्यांच्या कारला स्क्रॅच आली. या घटनेनंतर दोन्ही पक्षांची आपसात भांडणे सुरू झाली. त्यावेळी गाडीत बसलेल्या दिवाकर मोटवानी (28) या तरुणाने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हे पाहून आय-20 कारमधील तरुणांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आय-20 कारमधून 5 मुले बाहेर आली आणि त्यांनी दिवाकर आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. यानंतर I-20 कारच्या चालकाने गाडी मागे घेत दिवाकारला चिरडले, यात दिवाकर काही फूट दूर जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला कैलास रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (In a brawl over a car crash in Noida, one youth crushed another, incident caught in cctv)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.