AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक डोळा निळा तर एक पिवळा! भारतात सापडली दुर्मिळ मांजरीची प्रजाती, किंमत वाचून हादराल

या मांजरीचे डोळे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. कारण या प्रजातीची मांजर सहसा भारतात दिसत नाही.

एक डोळा निळा तर एक पिवळा! भारतात सापडली दुर्मिळ मांजरीची प्रजाती, किंमत वाचून हादराल
| Edited By: | Updated on: Jan 26, 2021 | 9:40 AM
Share

भोपाळ : प्राणी आणि पक्षांमध्ये अनेक संशोधनं होत असतात. आताही असंच एक संशोधन समोर आलं आहे. मांजरी एक दुर्मिळ प्रजाती सापडली आहे. ही मांजर सध्या सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर, ही मांजर इतकी वेगळी आहे की ती पाहण्यासाठी गावात लोकांनी मोठी गर्दी केली आहे. सगळ्यात विशेष म्हणजे पांढर्‍या रंगाच्या या मांजरीचा एका डोळा निळा आणि दुसरा डोळा पिवळ्या रंगाचा आहे. या मांजरीचे डोळे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. कारण या प्रजातीची मांजर सहसा भारतात दिसत नाही. (in madhya pradesh forest found rare species of cat one eye is blue and one yellow here know the price)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बैतूल गावात ही मांजर सापडली आहे. अनुभव सिंह हे दोन महिन्यांपूर्वी काही कामानिमित्त सारणी इथं जात होते. जंगलाच्या वाटेवर जात असताना ते एका ठिकाणी थांबले. तिथे त्यांनी पाहिलं की एका झाडावर माजंर बसली होती. आणि काही कुत्रे तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे अनुभव यांनी मांजरीचा जीव वाचवण्यासाठी आधी कुत्र्यांना पळवून लावलं आणि मांजरीला घेऊन ते घरी आले.

घरी आल्यानंतर अनुभव सिंह यांनी पाहिलं की मांजर इतर मांजरींच्या प्रजातीपेक्षा वेगळी आहे. पांढऱ्या रंगाची मांजर पण तिचे डोळे मात्र दोन वेगवेगळ्या रंगाचे होते. तिच्या डोळ्याचं एक रंग निळा आणि एक रंग पिवळा होता. अनुभव सिंह आणि त्याच्या कुटुंबाने या मांजरीला पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर खूप तपास केला असता या मांजरीची प्रजाती ही अंत्यत दुर्मिळ असल्याचं लक्षात आलं.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण आंतरराष्ट्रीय बाजारात या मांजरीची किंमत डॉलरमध्ये आहे. जी भारतीय चलनानुसार पाच ते सात लाख रुपये आहे. यामुळे ही मांजर भेटल्यामुळे अभिनव स्वत:ला भाग्यवान समजू लागले. एका माहितीनुसार, अशा मांजरांना खाओ मेनी कॅट असं म्हणतात. यांच्या प्रजाती थायलंडमध्ये आढळतात. यांचा 100 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. खूपच दुर्मिळ अशा या मांजरीचं वैशिष्ट्य म्हणजे या खूप स्मार्ट असतात. यामुळे मांजरीच्या प्रजाती वाढवण्यासाठी सध्या विशेष प्रजनन केलं जात आहे. (in madhya pradesh forest found rare species of cat one eye is blue and one yellow here know the price)

संबंधित बातम्या – 

VIDEO: पावसात भिजत होती कोंबडीची पिल्लं, आईने असं काही केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

समुद्र किनारी कचऱ्यामध्ये दिसली ‘जलपरी’, फोटो पाहून नेटकरी घाबरले; वाचा संपूर्ण सत्य

(in madhya pradesh forest found rare species of cat one eye is blue and one yellow here know the price)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.