Jammu Kashmir : 18 तासांत 7 अतिरेक्यांचा खात्मा! काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई, सर्च ऑपरेशन सुरु

7 Terrorist Killed : एकूण तीन वेगवेगळ्या एन्काऊटंरमध्ये सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय.

Jammu Kashmir : 18 तासांत 7 अतिरेक्यांचा खात्मा! काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई, सर्च ऑपरेशन सुरु
काश्मीर खोऱ्यात आणखी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:18 AM

जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir) लष्करानं ‘मिशन झिरो टेररीझम’ सुरु केलं असून गेल्या 18 तासात तब्बल 7 अतिरेक्यांचा खात्मा (Terrorist Killed) करण्यात आलाय. एकूण तीन वेगवेगळ्या एन्काऊटंरमध्ये सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय. यानंतर लष्कराच्या (Indian Army) जवानांकडून सर्च ऑपरेशनही केलं जातंय. लष्कर ए तोयबाचे चार अतिरेकी, जैशचे दोन अतिरेकी ठार करण्यात आलेत. कुपवाडा, पुलावामासह कुलगामध्ये लष्कराकडून करण्यात आलेल्या एन्काऊटंरमध्ये ही कारवाई करण्यात आली. कुपवाडाच्या लोलाब इथं झालेल्या चकमकीमध्ये चार लष्कर ए तोयबाचे अतिरेकी मारण्यात आले. तर डीएच पोरा कुलगाममध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोघा जैशच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर छातपुरा या पुलवामा येथील चकमकीमध्ये एका लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला. सध्या या तिन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जातंय.

गेल्या 24 तासातली सगळ्यात मोठी कारवाई

भारतीय लष्करानं गेल्या 24 तासांत केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे जम्मू काश्मिरातील अतिरेक्यांचं धाबं दणाणलंय. सध्या  या ठिकाणी सर्च ऑपरेशन जारी असून पुढील तपास केला जातोय.

हे सुद्धा वाचा

घमासान रविवार

रविवारी कुपवाडा आणि कुलगाममध्ये सकाळपासूनच चकमक सुरु झाली होती. या चकमकीदरम्यान काही अतिरेकी दबा धरुन बसल्याची माहिती स्थानिक पोलिसांसह लष्कराला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरुवातील चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर एका पाकिस्तानी रहिवासीही चकमकीत ठार झाला होता. दरम्यान, त्यानंतर आणखी तिघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

टार्गेट किलिंगला प्रत्युत्तर

जम्मू काश्मिरात शनिवारी पुलवामामध्ये एका पोलीसाची हत्या करण्यात आलेल. पोलीस सब इन्स्पेक्टरचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. या पोलिसांची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्याआधीही अतिरेक्यांकडून टार्गेट किलिंग करण्यात आलेलं. या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत सात अतिरेक्यांचा खात्मा केलाय.

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.