Boycott: ‘या’ राज्यात एका समाजाकडून ब्राह्मणांवर बहिष्कार, पूजा-पाठ करण्यासाठी बोलावले तर 5100 रुपयांचा दंड, भाजपा अडचणीत?

सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होते आहे. त्याच्यावरील तारीख जुनी आहे. मात्र या पत्रावरुन २३ ऑगस्ट रोजी काही गावांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे. एका गावातील निर्णयात असे लिहिण्यात आले आहे की, सिद्धबाबा मंदिराच्या परिसरात लोधी समाजातील सगळे जण एकत्र जमा झाले होते. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला आहे की, यापुढे किर्तन, लग्न, वाद किंवा होमहवनासाठी ब्राह्मणांना बोलावण्यात येणार नाही. जर कुणी ब्राह्मणाला घरात पूजेसाठी बोलावले तर त्याच्यावर 5100 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

Boycott: 'या' राज्यात एका समाजाकडून ब्राह्मणांवर बहिष्कार, पूजा-पाठ करण्यासाठी बोलावले तर 5100 रुपयांचा दंड, भाजपा अडचणीत?
ब्राह्मणांवर बहिष्कार
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 10:51 PM

शिवपुरी – ब्राह्मणांवर बहिष्कार (Boycott Brahmins)घालण्याचा निर्णय शिवपुरी या जिल्ह्यात घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात (Shivpuri, MP)हे लोण आणखीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोधी समाजाने ब्राह्मणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळे करण्याचे कारणही राजकीय आहे. लोधी समाजाचे मोठे नेते प्रीतम लोधी (Pritam Lodhi)यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात ब्राह्मणांना विरोध सहन करावा लागत होता. ब्राह्मणांना खूश करण्यासाठी भाजपाने प्रीतम लोधी यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर ओबीसी समाजाने मध्य प्रदेशात भाजपाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. याच काळात प्रीतम लोथी यांच्या विरोधात काही पूजा करणारे, कथाकार, कीर्तनकारही बोलण्यास सुरुवात झाली. हे भाजपाचे समर्थक मानले जातात. आता ही लढाई दोन जातींवर येऊन ठेपली आहे. यात अडचण झाली आहे ती भारतीय जनतचा पार्टीची.

घरातील पूजेला ब्राह्मणांना न बोलावण्याचा निर्णय

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील लोधी समाजाने असा निर्णय घेतला आहे की, घरात करणाऱ्यात येणाऱ्या पूजा किंवा कर्मकांडांसाठी ब्राह्मणांना बोलावणार नाही. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनीही हा निर्णय घेतला आहे की, जर कुणी घरी पूजेसाठी ब्राह्मणाला बोलावले तर त्याच्यावर पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल. शिवपुरी जिल्ह्यात अनेक गावात अशी पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकावर लोधी समाजाती अनेकांनी स्वाक्षऱ्याही केलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील पत्र जुने पण अनुकरण वाढले

सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होते आहे. त्याच्यावरील तारीख जुनी आहे. मात्र या पत्रावरुन २३ ऑगस्ट रोजी काही गावांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे. एका गावातील निर्णयात असे लिहिण्यात आले आहे की, सिद्धबाबा मंदिराच्या परिसरात लोधी समाजातील सगळे जण एकत्र जमा झाले होते. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला आहे की, यापुढे किर्तन, लग्न, वाद किंवा होमहवनासाठी ब्राह्मणांना बोलावण्यात येणार नाही. जर कुणी ब्राह्मणाला घरात पूजेसाठी बोलावले तर त्याच्यावर 5100 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. जर कुणी या निर्णयाचे उल्लंघन केले तर त्याला समाजातून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोधी विरुद्ध ब्राह्मण वाद वाढणार?

अशाच प्रकारचा नि्णय लोधी समाजाचे बहुमत असलेल्या अनेक गावांमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. हा निर्णय झाल्यानंतर याचा पंचांसमोर पंचनामाही तयार करण्यात आला आहे. हा निर्णय गावांमध्ये वाटण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भिंड जिल्ह्यात प्रीतमसिंह यांच्या नेतृत्वात एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. आता बहिष्कारानंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

अडचणीत भाजपा

2023 साली मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रीतम लोधी यांना भाजपातून काढण्यात आल्यानंतर हा वाद वाढलेला दिसतो आहे. वाद वाढल्यानंतर भाजपा बॅकफूटवर गेल्याचे मानण्यात येते आहे. 2023 पूर्वी कोणतीही जोखीम उचलण्याची पक्षाची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे. दोन्ही जातींना सांभाळण्याचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे. उमा भारतीय याच लोधी समाजातून येतात. पक्षाला हा वाद तातडीने मिटवायचा आहे. या दोन्ही जातीचे मतदार हे भाजपाचे आहेत. प्रीतम लोधी यांच्यवर कारवाई झाल्यानंतर पक्षातूनही विरोध झाला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.