Train Accident: रेल्वे इंजीनमध्ये अडकून तब्बल 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला; आजपर्यंतचा सर्वात भयानक रेल्वे अपघात

या धडकेनंतर अपघात ग्रस्त तरुण इंजीनसह रेल्वे ट्रॅकवरुन 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला. दरम्यान, ही रेल्वे सिरथूच्या कांशीराम कॉलनीजवळ पोहोचली असता रेल्वे ट्रॅक जवळील शेतात काम करणाऱ्या लोकांना रेल्वेच्या इंजिनला तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे पाहिले.

Train Accident: रेल्वे इंजीनमध्ये अडकून तब्बल 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला; आजपर्यंतचा सर्वात भयानक रेल्वे अपघात
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 5:41 PM

कौशाम्बी: आजपर्यंत आपण रेल्वेचे अनेक भयानक अपघात पाहिले असतील. मात्र उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) आजपर्यंतचा सर्वात भयानक रेल्वे अपघात(train accident) झाला आहे. या भीषण अपघातात रेल्वे इंजिन मध्ये अडकून( stuck in a railway engine) एक तरुण तब्बल आठ किलोमीटर पर्यंत फरफटत गेला आहे. रेल्वे ट्रॅक शेजारी असलेल्या शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनी रेल्वे एंजीनला लटकलेल्या अवस्थेत हा तरुण पाहिला यानंतर हा डेंजर अपघात उघडकीस आला. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. या भयानक अपघातामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वेच्या इंजीनमध्य अडकला तरुण

उत्तर प्रदेशातील कौशींबी जिल्ह्यात हा थराराक अपघात घडला आहे. सैनी कोतवाली परिसरातील घुमई गावाजवळ हा अपघात झाला. दिल्ली-हावडा मार्गावरुन कानपूरकडून येणाऱ्या ट्रेनने एका तरुणाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती हा तरुण रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला.

रेल्वे ट्रॅकवरुन तरुण इंजीनसह 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला

या धडकेनंतर अपघात ग्रस्त तरुण इंजीनसह रेल्वे ट्रॅकवरुन 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला. दरम्यान, ही रेल्वे सिरथूच्या कांशीराम कॉलनीजवळ पोहोचली असता रेल्वे ट्रॅक जवळील शेतात काम करणाऱ्या लोकांना रेल्वेच्या इंजिनला तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे पाहिले.

ट्रेन थांबवून मृतदेह बाजूला काढला

नागरीकांनी धावाधाव करत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रेन थांबल्यानंतर इंजिनमध्ये अडकलेल्या तरुणाचा मृतदेह बाजूला काढण्यात आला.

पोलिस घटनास्थळी दाखल

याबाबतची माहिती स्टेशन मास्तर व पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जीआरपी सिरथू आणि सैनी पोलिस स्टेशनचे एसएचओ फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह इंजिनमधून बाहेर काढला. त्यानंतर ही ट्रेन रवाना करण्यात आली.

अपघातामुळे अनेक ट्रेन खोळंबल्या

या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील अनेक ट्रेन खोळंबल्या. अपघातामुळे ट्रेन मध्येच थांबली होती. मृतदेह इंजीनमधीन काढल्यानंतर या मार्गावरील ट्रेन रवाना झाल्या. या तरुणाची रेल्वेला धडक कशी झाली? हा तरुण इंजीनमध्ये कसा अडकला याचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, रेल्वे रुळ ओलंडताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.