AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानच्या धर्तीवर उभं राहिलेलं मियावाकी जंगल नेमकं कसंय? PM नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलंय… वाचा!

कमी वेळात जास्त वनराई, जपानच्या अकीरा मियावाकी यांनी विकसित केलेलं जंगल नेमकं कसंय?

जपानच्या धर्तीवर उभं राहिलेलं मियावाकी जंगल नेमकं कसंय? PM नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलंय... वाचा!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 31, 2022 | 2:52 PM
Share

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सोमवारी स्टॅच्यु ऑफ युनिटीला (Statue Of Unity) भेट दिली. लोहपुरुषाला श्रद्धांजली वाहिली. या वेळी त्यांनी गुजरातमध्ये जपानमधील मियावाकी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या जंगलाचं (Miyawaki forest) लोकार्पण केलं. जपानमधील बॉटनिस्ट अकीरा मियावाकी यांनी हे कमी वेळात घनदाट जंगल उभं करण्याची ही पद्धती विकसित केली. गुजरातमधील केवडिया इथं हे जंगल विकसित करण्यात आलंय. हवामान बदलाचा परिणाम कमी करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे जंगल उभारण्यात आलंय.

दोन एकरात पसरलेल्या या जंगलात फर्निचरसाठीची झाडं, फळझाडं, औषधी वनस्पती तसेच फुलझाडं आहेत.

मियावाकी जंगल नेमकं काय?

मियावाकी जंगल खास पद्धतीने विकसित केलं जातंय. ते दीर्घकाळ हिरवं राहतं. फक्त त्यांना गरजेनुसार, वातावरण मिळालं पाहिजे. कमी वेळात जास्त हिरवाई आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देणं ही या जंगलाची खासियत.

जंगलाचे निर्माते बॉटनिस्ट अकीरा मियावाकी यांच्या मते, मंदिर, चर्च किंवा इतर धार्मिक स्थळांवरील वृक्ष अत्यंत प्राचीन असतात. तेथील अनेक झाडं आपोआप उगवलेली असतात. त्यामुळे ती वर्षानुवर्षे तशीच राहतात. झाडांच्या याच वैशिष्ट्याचा आधार घेत मियावाकी जंगलाची पद्धती विकसित करण्यात आली.

नैसर्गिक पद्धतीनेच झाडं उगवली तर ती अधिक काळ टिकून राहतात. वेगाने फुलतात, फळं धारण करतात. दीर्घकाळ हिरवी राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मियावाकी जंगलाचं लोकार्पण-

मियावाकी जंगलाची 5 वैशिष्ट्य-

  1.  ज्या ठिकाणी जंगल विकसित करायचंय, तेथील स्थानिक वातावरणानुसारच झाडं लावावी. बियांपासून झाडं लावायची असतील तर तेथील मातीतून उगवलेल्या झाडाच्याच बिया हव्यात. या बियांपासून आधी नर्सरीत रोपं उगवावीत आणि नंतर जंगलाच्या ठिकाणी लावावी.
  2. जिथं जंगल विकसित करायचंय, तिथे लाकडी भुसा, शेण, सेंद्रिय खत किंवा नारळाच्या शेंट्या टाकून जमिनीचा पोत वाढवावा. नर्सरीतून आणलेली रोपटी अर्ध्या फुटाच्या अंतारने लावावीत. गर्द झाडी असलेली, मध्यम आकारची आणि लहान आकाराची झाडे अशा तीन वर्गवारीनुसार झाडं लावावीत. जेणेकरून ती एकमेकांच्या मदतीने वाढतात.
  3.  रोपटी लावल्यानंतर त्यांच्या आजू-बाजूला गवत, सुकी पानं टाकावीत. त्यामुळे जमिनीची आर्द्रता टिकून राहते. तीव्र ऊन असल्यावर एक थर म्हणून हे झाडांची सुरक्षा करते. 2 ते 3 वर्ष देखभाल केल्यास ते जंगलासारखे विकसित होते.
  4.  या तंत्रज्ञानाने झाडं कमी वेळात भराभर वाढतात. कमी खर्चात 10 पट वेगाने आणि 30 पट जास्त घनदाट जंगल तयार होते. त्यामुळे हवामानावर याचा प्रतिकुल परिणाम होणार नाही.
  5.  या पद्धतीने रोपटी लावण्यासाठी सर्वात उत्तम काळ मान्सूना असतो. पावसाच्या पाण्याने झाडं लवकर लागतात. त्यांना देखभालीची गरज कमी पडते. कमी जागेत जास्त झाडे असल्याने हे जंगल ऑक्सिजन बँकेसारखं काम करतं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?