AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवीच्या पुस्तकातील राष्ट्रगीतातून ‘हा’ शब्दच वगळला; त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले अजबच उत्तर…

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या पुस्तकातील एक गंभीर चुक समोर आली आहे. यावर्षी वाटण्यात आलेल्या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकातून अपूर्ण राष्ट्रगीत छापण्यात आले आहे. ही गोष्ट उघड झाल्यानंतर आता अधिकारी ही चूक झाकण्यासाठी राष्ट्रगीतातील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाचवीच्या पुस्तकातील राष्ट्रगीतातून 'हा' शब्दच वगळला; त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले अजबच उत्तर...
| Updated on: Sep 11, 2022 | 1:27 PM
Share

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांचे आता दुसरे सत्र सुरु होत आहे. तरीही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारकडून अजूनही पाठ्य पुस्तकांचे वाटप केले जात आहे. शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना जी काही पुस्तकं वाटण्यात आली आहेत, त्या पुस्तकातील राष्ट्रगीतामधून (National Anthem)  उत्कल आणि बंग हा शब्दच वगळण्यात आला आहे. त्या चुकीवर स्पष्टीकरण देताना शिक्षणाधिकाऱ्यानी मात्र प्रिटींग मिस्टेकमुळे (Printing Mistake) ही चूक झाल्याचे सांगितले आहे. सरकारी शाळेतील पाचवीच्या पुस्तकात जे राष्ट्रगीत छापण्यात आले आहे, त्यामध्ये जन-गन-मन पासून पंजाब-सिंधू-गुजरात-मराठा पर्यंत व्यवस्थित छापण्यात आले आहे. मात्र त्यानंतर विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा या ओळी छापण्यात आल्या आहेत.

पुस्तकातील ही चूक फक्त एक दोन पुस्तकातून छापण्यात आली नाही तर जेवढी 1 लाखापेक्षा जास्त काही पुस्तकं छापण्यात आली आहेत. त्या सर्व पुस्तकातून ही चूक झाली आहे.

1 लाखापेक्षाही जास्त पुस्तकं छापली

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात 1 हजार 89 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 1 लाख 82 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मात्र एप्रिल महिन्यात पहिले सत्र सुरु होऊनही ही पुस्तकं देण्यात मात्र दिरंगाई केली गेली आहे. त्यामुळे मुलांना जुन्याच पुस्तकांचा आधार घेऊन अभ्यास करावा लागत आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले अजब उत्तर

पाठ्यक्रमातील पुस्तकातील चूक लक्षात आणून दिल्यानंतर मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी ही चूक प्रिटींग मिस्टेकमुळे झाली असल्याचे सांगितले.

आता ही चूक दुरुस्त केली जाणार असून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुस्तकातील ही चूक नजरचुकीमुळे झाली असून जाणीवपूर्वक केले नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मदरशांमधील शाळेतून राष्ट्रगीत सक्तीचे

याआधीही उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीतावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रमजानच्या सुट्टीनंतर उघडलेल्या सर्व मदरशांमधील शाळेतून राष्ट्रगीत सक्तीचे करण्याचे आदेश काढण्यात आले होते. हे आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांसाठी देण्यात आले होते.

राष्ट्रगीतासाठी आदेश

तसेच राज्यातील मान्यताप्राप्त आणि अनुदानित मदरशांमधील शाळेतून शैक्षणिक सत्र सुरू होताच राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात यावे असं पत्रही अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले गेले होते, आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणीही करण्यात आली होती.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....