
स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारत फार मोठा होता. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र देश झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तर पाकिस्तान एक दिवस अगोदर 14 ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिवस साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावरून तिंरगा फडकवतात. दिल्ली येथे ऐतिहासिक लाल किल्ला आहे. पण पाकिस्तानमध्ये लाल किल्ला आहे का? यावेळी तिथे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ध्वज फडकवला. पण जिथे हा कार्यक्रम झाला ती जागा माहिती आहे का? स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे पंतप्रधान कुठे त्यांचा राष्ट्रध्वज फडकवतात हे तुम्हाला माहिती आहे का?
पाकिस्तानमध्ये कुठे फडकवतात राष्ट्रध्वज?
भारतात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवतात. पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी एक खास जागा आहे. त्याला राष्ट्रीय स्मारक असे म्हणतात. पाकिस्तानच्या राष्ट्रीय स्मारकावर पंतप्रधान ध्वज फडकवतात. इस्लामाबाद या राष्ट्रीय राजधानी जवळ शकरपारिया नावाचा टेकड्या आहेत. तिथे हे स्मारक उभारण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर स्मारकाची निर्मिती
इस्लामाबादमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती 2006 मध्ये करण्यात आली. इंजिनिअर सैय्यद महमूद खालीद यांनी हे स्मारक तयार केले. 23 मार्च 2007 रोजी या इमारतीचे उद्धघाटन करण्यात आले आहे. येथे एक संग्रहालय पण तयार करण्यात आले आहे. तिथे पाकिस्तानचा इतिहास आणि संस्कृतीचे (मुळात भारतीय संस्कृतीचे) दर्शन होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला तिरंगा
दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवतात. लाल किल्ला ही काही मोठी इमारत नाही. तर भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. लाल किल्ला 1638 ते 1648 या दरम्यान मुघल बादशाह शाहजहा याने तयार केला होता. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता. तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यांनी पाकिस्तानला पुन्हा आकळीक न करण्याचे बजावले. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.