AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Trishul : राफेलची गर्जना, बॉर्डरजवळ भारतीय सैन्याने पाकिस्तानला हादरवून सोडलं

Operation Trishul : भारताच्या या मोठ्या सैन्य प्रदर्शनाने इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे.पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचे अनेक भाग बंद केले आहेत. पाकिस्तानच्या एविएशन अथॉरिटीने NOTAM (Notice to Airmen) जारी करुन मध्य आणि दक्षिणी हवाई मार्गावर 48 तासांसाठी उड्डाण बंद केली आहेत.

Operation Trishul :  राफेलची गर्जना, बॉर्डरजवळ भारतीय सैन्याने पाकिस्तानला हादरवून सोडलं
Operation Trishul
| Updated on: Oct 30, 2025 | 4:30 PM
Share

भारताने आजपासून पाकिस्तान सीमेजवळ आपल्या सर्वात मोठ्या संयुक्त सैन्य अभ्यास त्रिशूलला सुरुवात केली आहे. ट्राय सर्विस (पायदळ, नौदल आणि एअरफोर्स) यांचा युद्धाभ्यास 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 3 नोव्हेंबरपासून या सैन्य अभ्यासाला अजून गती येईल. ऑपरेशन सिंदूरनंतर सहा महिन्यांनी भारताचा हा पहिला मोठा सैन्य अभ्यास आहे. सूत्रांनुसार, भारत आपल्या सीमांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे, हा स्पष्ट संदेश देणं या अभ्यासामागचा मुख्य उद्देश आहे. गरज पडल्यास, ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा तिथून सुरु होऊ शकतो. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर स्थगित झालेलं.

त्रिशूलच आयोजन गुजरात आणि राजस्थानमध्ये केलं जातय. त्यांचा मुख्य फोकस कच्छ क्षेत्रावर आहे. कारण पाकिस्तान सोबत नव्या तणावाची सुरुवात तिथून होऊ शकते. अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला की, पाकिस्तानने गुजरातच्या सर क्रीरमध्ये भारताची जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, तर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास, भूगोल दोन्ही बदलला जाईल. पाकिस्तानने सर क्रीक भागात सैन्य चौक्या, बंकर, रडार आणि ड्रोन लॉन्च बेस बनवले आहेत. भारताचं त्यावर बारीक लक्ष आहे.

या युद्धाभ्यासात तिन्ही सैन्यांची अत्याधुनिक शस्त्र, कमांडो युनिट्स सहभागी होणार आहेत

पायदळ : टी-90 रणगाडे, ब्रह्मोस मिसाइल यूनिट्स आणि आकाश एअर डिफेंस सिस्टिम

एअरफोर्स : राफेल आणि सुखोई-30 सारखे फायटर जेट्स, सी गार्डियन आणि हेरॉन ड्रोन

नौदल : कोलकाता-क्लास डिस्ट्रॉयर, निलगिरी-क्लास फ्रिगेट्स आणि वेगाने हल्ला करणारी जहाजं

त्याशिवाय भारतीय सैन्याची पॅरा एसएफ (Para SF), नौदलाची मरीन कमांडो यूनिट (MARCOS) आणि एअरफोर्सची गरुड कमांडो फोर्स या युद्ध सरावात सहभागी होतील.

इस्लामाबादमध्ये खळबळ

भारताच्या या मोठ्या सैन्य प्रदर्शनाने इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे. सराव सुरु होण्याआधी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचे अनेक भाग बंद केले आहेत. पाकिस्तानच्या एविएशन अथॉरिटीने NOTAM (Notice to Airmen) जारी करुन मध्य आणि दक्षिणी हवाई मार्गावर 48 तासांसाठी उड्डाण बंद केली आहेत. यातून पाकिस्तानची भिती स्पष्टपणे दिसून येते.

कुठल्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी सुद्धा सक्षम

त्रिशूल फक्त सैन्य सराव नाही, एक रणनितीक संकेत आहे की,भारत आता आपली सुरक्षा आणि सीमा अखंडतेसाठी कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे. पाकिस्तानला इशारा देण्यासह ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या सैन्य तत्परतेचही परीक्षण होईल. त्रिशूल भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ट्राय सर्विस अभ्यासापैकी एक आहे. भारत आता फक्त सर्तकच नाही, तर कुठल्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी सुद्धा सक्षम आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.