Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमारांचा 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा, कुणाचा दावा?

Gyanesh Kumar Resign: राजधानी दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक आंदोलन करत असतानाच एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा देण्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?

Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमारांचा 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा, कुणाचा दावा?
ज्ञानेश कुमारांचा 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा
| Updated on: Oct 06, 2026 | 12:55 PM

INDIA Bloc Protest Against Gyanesh Kumar: देशाच्या राजधानीत आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठे रणकंदन सुरू आहे. 19 विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली. आयोगाच्या मुख्यालयाबाहेर मोठे आंदोलन सुरू आहे. काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आकाशवाणी भवनात पोहचले आहे. त्याचवेळी आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा देण्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?

CJP च्या आंदोलनाचा धसका?

Loading...

आम आदमी पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार असल्याचा दावा केला आहे. आयोगातील सूत्रांच्या आधारे हा दावा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, ज्ञानेश कुमार हे येत्या 10 ऑक्टोबर पूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. याच तारखेपासून दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांची कॉकरोच जनता पार्टी (CJP) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहे. आता माघार नाही, राजीनामा घेणार असा दावा सीजेपीच्या सौरभ दास यांनी केला आहे. सध्याची धामधूम बघता दिल्लीत मोठं काहीतरी होणार असा दावा केवळ आपच नाही तर इंडिया आघातील नेतेही करत आहेत.

आज इंडिया आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 19 विरोधी पक्षांची मोट दिसून आली. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार रस्त्यावर उतरले. त्यांनी तीन किलोमीटरचे अंतर पायी कापत निवडणूक आयोगावर धडक मोर्चा नेला. मुख्य कार्यालयापासून त्यांना पोलिसांनी अडवले. अनेक नेत्यांना, खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर राहुल गांधी यांना आकाशवाणी भवनात ताब्यात घेण्यात आले. आज इंडिया आघाडीने दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज इंडिया आघाडीने मोर्चा काढला.

CJP ची मोठी धास्ती

यापूर्वी मेच्या अखेरीस तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभारले. सव्वा महिना दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणाई ठिय्या मांडून होती. तर देशभरात आंदोलनाचे लोण पसरले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच प्रधान यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. तर आता ज्ञानेश कुमार यांच्या मदतीनेच भाजप अनेक राज्यात जिंकल्याचा आरोप गेल्या शुक्रवारी अभिजित दिपके यांनी मुंबईतील आंदोलनात केला होता. त्यांनी ‘ज्ञानू को जाना होगा’ असा इशारा सुद्धा दिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us