पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिकेची आकडेवारी

राजधानी दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न अपलोड करण्यात आलं आहे, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो.

पाच महिन्यात भारतात 25 हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिकेची आकडेवारी
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : भारतातील चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यात भारतातून तब्बल 25 हजार चाईल्ड पॉर्न व्हिडीओज् विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर अपलोड (India Child Pornography Report) झाले आहेत.

राजधानी दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न अपलोड करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा टॉप 5 मध्ये समावेश होतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अन्वेषण आणि अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉईटेड चिल्ड्रन’ या संस्थांनी ही झोप उडवणारी आकडेवारी जारी केली आहे. दोन्ही देशांनी ही माहिती शेअर करण्यासाठी गेल्या वर्षी करार केला होता.

चाईल्ड पॉर्नविषयक राज्यनिहाय आकडी जारी करण्यात आलेली नसली, तरी महाराष्ट्रातून एकूण 1700 व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याची माहिती आहे. देशभरात आरोपींचं अटकसत्र सुरु झाल्याचंही गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणं उघडकीस आली आहेत. एकट्या मुंबईतच 500 प्रकरणं घडल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षीच पॉक्सो कायद्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची व्याख्या बदलण्यात आली, त्याचप्रमाणे व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पॉर्नोग्राफी अंतर्गत फोटो, व्हिडीओ, डिजिटल किंवा कॉम्प्युटरवर बनवण्यात आलेले फोटो गुन्हा ठरवण्यात (India Child Pornography Report) आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI