AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोगरा, हॉट स्प्रिंग आणि डेपसांगमधील सैन्य वापसीवर चर्चा होणार; भारत-चीनमध्ये आज महत्त्वाची बैठक

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेगाँग लेकपासून उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भारत आणि चीन दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार आहे. (India, China to hold 10th round of Corps Commander level talks today)

गोगरा, हॉट स्प्रिंग आणि डेपसांगमधील सैन्य वापसीवर चर्चा होणार; भारत-चीनमध्ये आज महत्त्वाची बैठक
| Updated on: Feb 20, 2021 | 10:43 AM
Share

लडाख: पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेगाँग लेकपासून उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भारत आणि चीन दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशादरम्यान दहाव्या फैरीतील उच्चस्तरीय सैन्य वार्ता होणार आहे. या बैठकीत डेपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरामधील सैन्य वापसीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही देशांकडून पेगाँगमधून सैन्य वापस घेण्याच्या प्रक्रियेची समीक्षाही करणार आहेत. (India, China to hold 10th round of Corps Commander level talks today)

भारत आणि चीन दरम्यानची ही बैठक चीनजवळील मोल्दो सीमेवर होणार आहे. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करतील. मेनन हे लेह येथील 14व्या कोअरचे कमांडर आहेत. तर चीनी सैन्याच्या दक्षिणी शिनजियांग सैन्याचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन हे चीनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. पेगाँग खोऱ्यातील उत्तर आणि दक्षिणेकडील किनाऱ्यावरून सैनिकांची वापसी, शस्त्र आणि इतर समान, बंकर, टेन्ट्स आणि तात्पूरते बांधकाम हटवण्याचं काम गुरुवारीच पूर्ण झाल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांनी स्वत: याची पाहणीही केली आहे.

10 फेब्रुवारीलाच सैन्य वापसी सुरू

दोन्ही देशांनी 10 फेब्रुवारीच सैन्य वापसीची प्रक्रिया सुरू केली होती. आज होत असलेल्या बैठकीपूर्वीच चीनने मोठा खुलासा केला आहे. नऊ महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या हाणामारीत चीनचे चीन सैनिक मारल्या गेल्याचं चीनने पहिल्यांदाच कबूल केलं आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्त अहवालानुसार चीनचे 35 सैनिक या हाणामारीत मारले गेले आहेत. परंतु, चीनने हा आकडा मान्य केलेला नाही. दुसरीकडे चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने गलवान खोऱ्यातील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

भारताकडून व्हिडीओ जारी

भारतीय सैन्याने मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील डिसएंगेजमेंट प्रक्रियेचा व्हिडीओ आणि फोटो जारी केले होते. त्यात पेगाँगमधून चीनी सैनिक परत जाताना दिसत आहेत. तसेच पेगाँगमधील बंकर आणि इतर बांधकाम तोडतानाही दिसत आहे. भारत आणि चीन दरम्यानचा तणाव तब्बल 9 महिन्यानंतर निवळला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हाणामारीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

करारात काय झालं?

भारत आणि चीन सैन्य कमांडर कराराच्या नुसार, दोन्ही पक्ष पहिल्यासारखीच परिस्थिती कायम ठेवणार आहे. मे 2020 मध्ये वाद सुरू होण्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती कायम ठेवण्याचा यावेळी निर्णय झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं होतं. या करारानुसार चीन त्यांची सैन्य तुकडी पेगाँग नॉर्थमध्ये फिंगर-8च्या पूर्व दिशेने ठेवेल. तर भारतही आपली सैन्य तुकडी फिंगर-3 च्या जवळ कायमस्वरुपी धनसिहं राणा पोस्टजवळ ठेवेल. अशा प्रकारे साऊथ बँक परिसरात दोन्ही पक्षांकडून डिसएंगजमेंट करण्यात येईल. तसेच नॉर्थ बँकवर सुरू असलेली परंपरागत पेट्रोलिंग तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा पुढे गेल्यानंतर पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल, असंही या करारानुसार ठरलं आहे. (India, China to hold 10th round of Corps Commander level talks today)

संबंधित बातम्या:

दिल्ली शेतकरी आंदोलन टूलकिट प्रकरण, दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी, कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

केंद्र सरकारने काही केलं तरी विरोध करायचा ही फॅशन; शेतकरी आंदोलनावर भडकले ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

(India, China to hold 10th round of Corps Commander level talks today)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.