AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर्मनीत उद्यापासून News9 ग्लोबल महासमिट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाकडे देशाचं लक्ष

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला उद्या 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक स्टर्टगार्ट स्टेडियममध्ये ही समिट पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समिटचे मुख्य आकर्षण असणार आहेत. यासोबतच देश विदेशातील 50 हून अधिक मान्यवर या समिटमध्ये आपले विचार मांडणार आहेत. भारत आणि जर्मनीचे संबंध दृढ करण्यासाठी ही समिट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जर्मनीत उद्यापासून News9 ग्लोबल महासमिट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाकडे देशाचं लक्ष
News9 global summitImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2024 | 5:30 PM
Share

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटला उद्याच सुरुवात होणार आहे. जर्मनीच्या ऐतिहासिक स्टर्टगार्ट स्टेडियममध्ये भारत आणि जर्मनीचे राजकीय नेते, कार्पोरेट नेते, दिग्गज खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. भारत आणि जर्मनीचे संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न यावर या ग्लोबल समिटमध्ये मंथन होणार आहे. जर्मनीत होणाऱ्या या News9ग्लोबल समिटचे मुख्य अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

उद्या 21 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत ग्लोबल समीट चालणार आहे. भारत आणि जर्मनीच्या निरंतर आणि शाश्वत विकासासाठीच्या रोड मॅपवर या समिटमध्ये मंथन केलं जाणार आहे. जर्मनीचे औद्योगिक शहर स्टर्टगार्टच्या फुटबॉल मैदानावर MHP एरिनामध्ये गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता News9 ग्लोबल समिटचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडे 4 वाजता पीएम मोदी संबोधित करणार आहेत.

अश्विनी वैष्णव-ज्योतिरादित्य सिंधिया भाग घेणार

21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर News9 ग्लोबल समिटच्या महामंचावर संध्याकाळी 5:30 वाजता Tv9 नेटवर्कचे MD&CEO बरुण दास हे भारत आणि जर्मनी : निरंतर विकासासाठीच्या रोडमॅपवर आपले विचार मांडतील. त्यानंतर संध्याकाळी 5.50 वाजता याच विषयावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे संबोधित करणार आहेत. 6.5 वाजता श्रीनगर ते स्टर्टगार्ट : ग्राहक कॉरिडॉर या विषयावर मर्सिजीड बेंज (भारत) चे सीईओ संतोष आयर बोलतील. तर संध्याकाळी 7.40 वाजता दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया संबोधित करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे सेशन कोणते

News9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी Tv9 नेटवर्कचे MD&CEO बरुण दास यांच्या स्वागतपर भाषणानंतर इतर सेशन्स सुरू होतील. संध्याकाळपर्यंत भारत आणि जर्मनीचे धोरण निर्माते या कार्यक्रमात भाग घेतील. दोन्ही देशातील चिरंतन विकासावर यावेळी चर्चा केली जाणार आहे. निरंतर विकासाच्या अजेंड्यावर जर्मनीचे खाद्य आणि कृषी मंत्री सेम ओजदेमिर हे संबोधित करतील. त्यानंतर ग्रीन एनर्जी, एआय, डिजिटल अर्थव्यवस्था कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दुपारी 2 वाजता भारत संरक्षण उद्योग आणि आजच्या यूनिकॉर्नवर मंथन करेल.

मोदी मुख्य अतिथी

ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी 4.30 वाजता India: Inside the Global Bright Spot आ विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. त्याशिवाय कार्यक्रमात पोर्शे मारूती, सुजुकी, मर्सिडीज बेंज, भारत फोर्सशिवाय भारत आणि जर्मनीच्या अनेक व्यासायिक प्रतिष्ठान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आणि एसोचैम सारख्या व्यापारी संघाचे प्रतिनिधीही या समिटमध्ये भाग घेणार आहेत.

10 सेशन 50हून अधिक वक्ते

News9 ग्लोबल समिटमध्ये 10 सेशन होणरा आहेत. त्यात 50 हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. त्यात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स: अॅडव्हांटेज इंडिया’ या विषयावर टेक महिंद्राचे के हर्षुल असनानी, मायक्रोन इंडियाचे के आनंद राममूर्ती, MHP स्टिफन बॅयर आणि इन्स्टिट्यूट ऑफ अँत्रोपोमेटिक्सचे डॉ. जान नीह्यूस संबोधित करणार आहेत. ‘Bridging the Skill Gap: Crafting a Win-Win? या विषयावर क्वेस कॉर्पचे अजित इसाक, पीपल स्ट्राँगचे पंकज बंसल, डॉ. फ्लोरियन स्टॅगमन, फिंटिबाचे जोनास मार्ग्राफ सुद्धा आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्याशिवाय ‘Developed vs Developing: The Green Dilemma’ या विषयावर आंतरराष्ट्रीय सौरचे अजय माथुर, टीआरआयच्या डॉ. विभा धवन, हिरो फ्यूचर एनर्जीजचे राहुल मुंजाळ, फ्रॉनहोफर आयएसईचे प्रोफेसर एंड्रियास बेट, हेप सोलरचे डॉ. ज्यूलियन होशचर्फ आणि प्रीजीरोचे पीटर हार्टमॅन संबोधित करतील.

महत्त्वाचा टप्पा

Tv9 नेटवर्कचे MD & CEO बरुण दास यांनी News9 ग्लोबल समिटवर भाष्य केलं आहे. आम्ही भारतात आमची वार्षिक समिट केली होती. आता हीच समिट आंतरराष्ट्रीय पातळीवर जात आहे. या समिटमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा होणार आहे. या शिवाय या सोहळ्यात पुरस्कार वितरणही होणार आहे. या सोहळ्यात जगभरातील अनेक नामांकित लोक उपस्थित राहणार आहेत, असं बरुण दास यांनी सांगितलं.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.