AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सरकारचा मोठा निर्णय, 15 मे पर्यंत…

India Pakistan War: भारत - पाकिस्तान मध्ये तणावग्रस्त वातावरण, पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सुरक्षेच्या कारणास्तव, भारत सरकारने घेतला मोठा निर्णय, 15 मे पर्यंत...

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच, सरकारचा मोठा निर्णय, 15 मे पर्यंत...
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 10, 2025 | 9:26 AM
Share

India Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताना ‘ऑपरेशन सिंदूर राबवलं’ पाकिस्तानचा बदला घेतला. पण दशहतवाद्यांच्या मृत्यूनंतर बिधरलेल्या पाकिस्तानने कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. पाकिस्तान आता भारताच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य करत हल्ले करत आहे. पण भारताकडून पाकिस्तानचे सर्व प्रयत्न मोडून काढले जात आहे. देशात सध्या तणावग्रस्त वातावरण असताना भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने 15 मे सकाळी 5:29 वाजेपर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवर नागरी उड्डाणे स्थगित केली आहेत. यापूर्वी, सरकारने पाकिस्तानी सीमेवर आणि आजूबाजूला असलेली 25 विमानतळे शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या कोण-कोणते विमानतळं 15 मेपर्यंत बंद राहतील.

हे सुद्धा वाचा : काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर, आज अधिकाऱ्याचा मृत्यू, काश्मीरमधील भीषण वास्तव

सरकारच्या निर्णयानंतर उत्तर भारतातील श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, सिमला, पटियाला, लुधियाना, पठाणकोट, अंबाला, भटिंडा आणि पश्चिम भारतातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, उत्तरलाई, किशनगड, राजकोट, जामनगर, भुज, कांडला, मुंद्रा, पोरबंदर विमानतळं बंद राहतील. शिवाय गाझियाबादमधील हिंडन विमानतळ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दररोज 400 उड्डाणे रद्द

पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात दररोज 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली जात आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, 165 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर, एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा यासह सर्व विमान कंपन्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना परतफेड करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 5 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) एकूण 138 उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीचे आयजीआय विमानतळ सध्या उत्तर भारतातील एकमेव प्रमुख विमानतळ आहे जे कार्यरत आहे. डेहराडून, लखनऊ आणि जयपूर सारख्या जवळच्या काही शहरांचे विमानतळ सध्या सुरु आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.