ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्याने पाकची जिरवली,त्या मिसाईलची भारताने इस्राईलला दिली मेगा ऑर्डर
भारताने या मिसाईलला 2020-21 मध्ये गलवान चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आपात्कालिन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी खरेदी केले होते.

ऑपरेशन सिंदूरमधील कामगिरीनंतर भारतीय वायूसेना (IAF) आपली ताकद आणखीन वाढविण्याच्या तयारीत आहे. यासाठी भारतीय वायूसेनेने इस्राईलकडून हवेतून जमीनीवर हल्ला करणारी रॅम्पेज मिसाईलची (Rampage Missile) मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्याची तयारी केली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वायुसेनेत या मिसाईलला हाय-स्पीड लो ड्रॅग- मार्क 2 (HSLD Mk-II) नावाने ओळखले जाते.हे मिसाईल वायूसेनेच्या सु-30 MKI, जग्वार आणि मिग -29 सारख्या फायटर जेट विमानात वापरलेले आहेत.
रॅम्पेज मिसाईल काय आहे ?
रॅम्पेज एक अत्याधुनिक हवेतू जमीनीवर मारा करणारी मिसाईल आहे. ज्यास इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI)ने तयार केले आहे. याची खासीयत खालील प्रमाणे आहे.
रेंज: 150 ते 250 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याला नष्ट करते.
स्पीड: ही एक सुपरसॉनिक मिसाईल मॅक – 2 ( ध्वनीच्या दुप्पट वेगाने ) उडू शकते.
अचूकता : याचे INS/GPS नेव्हीगेशन सिस्टम आणि इलेक्ट्रो – ऑप्टीकल / इन्फ्रारेड (EO/IIR) सेंसरमुळे अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे.
उपयोग: हे मिसाईल बंकर, रडार स्टेशन, कमांड सेंटर आणि अन्य मजबूत लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी तयार केले आहे
रॅम्पेजचे भारतीय वायुसेनेत इंटीग्रेशन
रॅम्पेज मिसाईलला भारतीय वायूसेनेत रशियन जेट विमानात सामील केले आहे. यात खालील विमानांत वापर होणार आहे.
सु-30 MKI: सुखोई हे भारताचे सर्वात ताकदवान लढाऊ विमान असून त्यास हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तयार केले आहे. या विमानातून ब्रह्मोज आणि रॅम्पेजसारखी मिसाईल डागता येतात.
मिग-29: हे हलके आणि चपळ विमान आहे. जे आता रॅम्पेजसह आणखी खतरनाक झाले आहे
जग्वार: हे एक जुने आणि विश्वासार्ह विमान असून त्यास रॅम्पेज मिसाईलने अपग्रेड केले आहे.
मिग-29K: भारतीय नौसेनेच्या विमानवाहू नौकावर तैनात या विमानालाही रॅम्पेज मिसाईल अपलोड केले जाणार आहे. वायूसेना आता अन्य विमानांना उदा. तेजसला देखील रॅम्पेज मिसाईल लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
मेगा ऑर्डर आणि मेक इन इंडिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये रॅम्पेज मिसाईलनी चांगली कामगिरी केली आहे.भारतीय वायूसेने मोठ्या प्रमाणावर त्यास खरेदी करण्याची योजना बनवली आहे. ही ऑर्डर फास्ट ट्रॅक ऑर्डर अंतर्गत देण्यात आली आहे. वायसेना मेक इन इंडियांतर्गत या रॅम्पेज मिसाईलना भारतात मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा विचार करत आहे. इस्राईल एअरोस्पेश इंडस्ट्रीज (IAI) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BEL) 2023 मध्ये एअरो इंडियाने एक करार केला होता. ज्या अंतर्गत भारतात रॅम्पेजचे उत्पादन होऊ शकते. यास कमी भांडवल लागणार असून भारताचा आत्मनिर्भरता वाढणार आहे.
