Corona Cases India | देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 10 लाख 77 हजार 410 वर गेला आहे. (India record break COVID19 cases)

Corona Cases India | देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी
corona
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 10:11 AM

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 980 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले असून एका दिवसात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. (India reports record break 412262 new COVID19 cases in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या दोन दिवसापासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी होत होता. मात्र आज पुन्हा एकदा 24 तासातील रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 12 हजार 262 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 980 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 29 हजार 113 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी 72 लाख 80 हजार 844 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 10 लाख 77 हजार 410 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 30 हजार 168 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 35 लाख 66 हजार 398 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या  16 कोटी 25 लाख 13 हजार 339 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 4,12,262

देशात 24 तासात मृत्यू – 3,980

देशात 24 तासात डिस्चार्ज -3,29,113

एकूण रुग्ण – 2,10,77,410

एकूण मृत्यू – 2,30,168

एकूण डिस्चार्ज – 1,72,80,844

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 35,66,398

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -16,25,13,339

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती (India record break COVID19 cases)

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

(India reports record break 412262 new COVID19 cases in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.