Maharashtra Coronavirus LIVE Update : ठाण्यात दिवसभरात 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

 • Updated On - 12:00 am, Fri, 7 May 21 Edited By: prajwal prajwal.dhage
Maharashtra Coronavirus LIVE Update : ठाण्यात दिवसभरात 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 06 May 2021 23:05 PM (IST)

  ठाण्यात दिवसभरात 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  ठाणे कोरोना अपडेट

  # दिवसभरात 692  जण कोरोनामुक्त

  # दिवसभरात 601 जणांना कोरोनाची बाधा,

  कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,22,793 वर

  # आतापर्यंत 1,13,883 रुग्ण कोरोनामुक्त

  रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.7 टक्क्यांवर

  # सध्या 7,167 रुग्णांवर  उपचार सुरु

  # दिवसभरात 8 जणांचा मुत्यू

  आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,743 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

 • 06 May 2021 22:14 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 813 नव्या रुग्णांची नोंद

  उस्मानाबाद : जिल्ह्यात आज सर्वाधिक 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे  813 नवे रुग्ण

  दिवसभरात 729  रुग्णांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुका 288, तुळजापूर 72,उमरगा 86, लोहारा 49, कळंब 104, वाशी 48, भूम 138 व परंडा 28 रुग्ण

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7252 सक्रिय रुग्ण

  आतापर्यंत 34 हजार 449 रुग्ण बरे, रिकव्हरी रेट 81.42 टक्क्यांवर

  आतापर्यंत 1005 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, मृत्यूदर 2.29 टक्क्यावर

   

 • 06 May 2021 22:11 PM (IST)

  सांगली जिल्ह्यात आढळले 2328 नवे कोरोना रुग्ण

  सांगली कोरोना अपडेट

  जिल्ह्यात आज दिवसभरात आढळले 2328 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2511 वर

  सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15902 वर

  उपचार घेणारे 1134 जण आज कोरोनामुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67234 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 85647 वर

 • 06 May 2021 22:09 PM (IST)

  नाशिकमध्ये दिवसभरात आढळले 4160 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

  नाशिक कोरोना अपडेट –

  – दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3782

  – दिवसभरात आढळलेले रुग्ण- 4160

  नाशिक मनपा- 2487 रुग्ण आढळले

  नाशिक ग्रामीण- 1612 रुग्ण आढळले

  मालेगाव मनपा- 0018 रुग्ण आढळले

  जिल्हा बाह्य- 0043 रुग्ण आढळले

  – नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3741

  – दिवसभरात 49 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

 • 06 May 2021 22:06 PM (IST)

  औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर गुन्हा दाखल

  औरंगाबाद : माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर गुन्हा दाखल

  वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल

 • 06 May 2021 21:07 PM (IST)

  धुळे शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

  धुळे : धुळे शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पाऊस

  साक्री तालुक्यात विटाई गावातील शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

  सुदाम खैरणार असे मृत शेतकऱ्याचे नाव,

   

 • 06 May 2021 21:05 PM (IST)

  सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

  सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

  8 तारखेला रात्री 8 वाजल्यापासून 15 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन

  हॉस्पिटल मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा राहणार बंद

  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

 • 06 May 2021 20:32 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यामध्ये 61 हजार नव्या लसी, 106 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

  नागपूर जिल्ह्यामध्ये 61 हजार नव्या लसी प्राप्त

  ज्येष्ठांसाठी 45 हजार कोव्हीशिल्ड

  16 हजार तरुणांसाठी कोव्हॅक्सिन

  ऑक्सिजनसाठी आज पुन्हा 4 टँकर विमानाने रवाना

  106 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

  4 हजार 485 रेमडेसिव्हीरचे वितरण

  जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली माहिती

 • 06 May 2021 20:29 PM (IST)

  वसई विरारमध्ये 24 तासात 769 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

  वसई विरार कोरोना अपडेट

  – वसई विरारमध्ये मागच्या 24 तासात 769 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

  दिवसभरात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 591 जण कोरोनामुक्त

  वसई विरार महापालिकेत रुग्णसंख्या 57903 वर

  मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1167 वर

  कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 45440 वर

  कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1129 वर

 • 06 May 2021 20:27 PM (IST)

  अकोल्यात दिवसभरात 508 जणांना कोरोनाची लागण, 11 जणांचा मृत्यू    

  अकोला कोरोना अपडेट

  आज दिवसभरात 508 रुग्ण पॉझिटिव्ह

  2717 अहवालांपैकी 2209 जणांचे अहवालात निगेटिव्ह

  ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 43801 वर

  आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

  कोरोनामुळे आतापर्यंत 754 जणांचा मृत्यू

  आज दिवसभरात 459 जणांना डिस्चार्ज

  तर 36860 जणांची कोरोनावर मात

  उपचार घेत असलेले रुग्ण- 6187

   

 • 06 May 2021 20:25 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 2902 रुग्णांची वाढ, 2986 रुग्णांना डिस्चार्ज 

  पुणे कोरोना अपडेट

  – दिवसभरात 2902 रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 2986  रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधित 86 रुग्णांचा मृत्य, 20 रूग्ण पुण्याबाहेरील

  – 1414 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 439251

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 39582 वर

  – एकूण मृत्यू -7184 वर

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 392485

   

 • 06 May 2021 20:16 PM (IST)

  नाशिकमध्ये नियम पाळण्यात हलगर्जीपणा, मनपाच्या भरारी पथकाकडून 1 लाख 93 हजारांचा दंड वसूल  

  – नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरू असताना नागरिकांचा मात्र नियम पाळण्यात हलगर्जीपणा

  – शहरात फिरताना मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, तसेच नियमबाह्य आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिकेने उगारलाय कारवाईचा बडगा

  – नियमांची पायमल्ली करणाऱ्या 299 नागरिकांकडून दिवसभरात मनपाच्या भरारी पथकाने 1 लाख 93 हजारांचा दंड केला वसूल

  – नियम पाळा, अन्यथा कारवाई होणार महापालिकेचा इशारा

 • 06 May 2021 18:49 PM (IST)

  नागपूरात मध्यरात्री उरकला भव्य लग्न समारंभ, मनपाने आकारला 50 हजारांचा दंड

  नागपूरात मध्यरात्री उरकला भव्य लग्न समारंभ

  – लग्न समारंभात 100 पेक्षा जास्त पाहुणे, कोरोनाचे नियम धाब्यावर

  – नागपूरातील सतरंजीपुरा झोन हद्दीत सुदर्शन नगरात लग्न समारंभ

  – 20 पाहूण्यांची परवानगी,100 पेक्षा जास्त पाहुणे

  – अनेकांनी घातला नव्हता मास्क, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा

  – मध्यपात्री दोन वाजता पोलीस आणि मनपाच्या एनडीएस स्कॅाडने केली कारवाई

  – मनपाने आकारला 50 हजारांचा दंड

 • 06 May 2021 18:47 PM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यात 1508 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात, 1508 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 15 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 67939

  एकूण कोरोनामुक्त : 50805

  सक्रिय रुग्ण : 16098

  एकूण मृत्यू : 1036

  एकूण नमूने तपासणी : 401153

 • 06 May 2021 18:46 PM (IST)

  नागपुरात 6338 रुग्णांनी केली कोरोनावर मात, 4900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपूरकरांना  काहीसा दिलासा, बधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

  आज नागपुरात 6338 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  4900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  तर 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  एकूण रुग्णसंख्या – 437838

  बरे होणाऱ्यांची संख्या – 365332

  एकूण मृत्यूसंख्या – 7909

 • 06 May 2021 18:44 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात आढळले 397 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

  गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

  आज वाढलेले रुग्ण – 397

  आज झालेले मृत्यू – 08

  आज बरे झालेल्या व्यक्ती – 603

  तालुका निहाय रुग्णसंख्या

  गोंदिया————–199

  तिरोडा————–67

  गोरेगाव————–38

  आमगाव————–15

  सालेकसा————-22

  देवरी——————17

  सडक अर्जुनी ———–22

  अर्जुनी मोरगाव——–05

  इतर राज्य————–12

  एकूण रुग्ण – 35737

  एकूण मृत्यू – 577

  एकूण बरे झालेले – 30721

  एकूण उपचार घेत असलेले – 4439

 • 06 May 2021 17:56 PM (IST)

  PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर, कनेक्टर नसल्याने 10 दिवसांपासून पडून

  नाशिक – PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर

  मात्र व्हेंटिलेटरचे कनेक्टर नसल्याने 10 दिवसांपासून पडून

  नाशिकच्या बिटको आणि झाकीर हुसेन महापालिकेच्या रुग्णालयात पडले आहेत हे व्हेंटिलेटर

  केंद्राच्या अर्धवट कारभाराचा पर्दाफाश

 • 06 May 2021 17:54 PM (IST)

  बदलापुरात येत्या शनिवार पासून मुरबाडसारखा कडक लॉकडाऊन

  बदलापूर : बदलापुरात येत्या शनिवार पासून मुरबाड सारखा  कडक लॉकडाऊन

  एक आठवड्याचा लॉकडाऊन लावण्याचा नगरपरिषदेचा निर्णय

  वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी घेतला निर्णय

  मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सगळ्या गोष्टी राहणार बंद

  अत्यावश्यक सेवा फक्त घरपोच असेल तरच सुरू करता येणार

  आमदार किसन कथोरे यांनी बोलावलेल्या बैठकीत झाला निर्णय

 • 06 May 2021 17:22 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात आढळले 496 नवे कोरोना रुग्ण, 6 जणांचा मृत्यू 

  वाशिम कोरोना अलर्ट

  वाशिम जिल्ह्यात 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  दिवसभरात आढळले 496 नवे कोरोना रुग्ण

  तर 498 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  36 दिवसात 137 रुग्णांचा मृत्यू

  तर मागील 36 दिवसांत आढळले 14442 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 30517

  सध्या सक्रिय रुग्ण – 4251

  एकूण कोरोनामुक्त रुग्ण – 25941

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 324

 • 06 May 2021 17:19 PM (IST)

  सई विरारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची मोठी झुंबड

  ठाणे : वसई विरार महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील लसीकरणासाठी आज सकाळ पासूनच नागरिकांची मोठी झुंबड

  पहाटे 3 ते 4 वाजल्यापासून नागरिकांच्या मोठ्याप्रमाणात रांगा

  तर लसीकरणच्या नंबरचे मनमानी कुपन ही वाटल्याचे उघड

  त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ

  राजकीय पक्षांसह नागरिकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

 • 06 May 2021 16:23 PM (IST)

  मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंकडून कोविड सेंटर्सचा आढावा

  मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला मुंबईतील विविध कोविड सेंटरचा आढावा

  याच अनुषंगाने हेमंत नगराळे दहिसर कोविड सेंटर येथे सुद्धा आढावा घेण्यासाठी पोहचले

  या वेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला

 • 06 May 2021 16:22 PM (IST)

  बीएआरसी करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा

  मुंबई : मुंबईतील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी ‘भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रा’तील (बीएआरसी) शास्त्रज्ञांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बीएआरसी ने मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

 • 06 May 2021 15:16 PM (IST)

  कर्नाटक राज्यातून सांगली जिल्ह्यासाठी येणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा थांबला

  सांगली : कर्नाटक राज्यातून सांगली जिल्ह्यासाठी येणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा थांबला

  कर्नाटकाच्या बेल्लारीमधून 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता

  मात्र ऑक्सीजनपुरवठा आजपासून बंद

  जिल्ह्यातील टँकर कर्नाटकमधून रिकामा परतला

  जिल्ह्याला रोजची 43 टन ऑक्सिजनची गरज

  ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता

 • 06 May 2021 14:28 PM (IST)

  वर्ध्याच्या जेनेटिक लाईफसायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडिसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

  वर्धा –

  – जेनेटिक लाईफसायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडिसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात

  – ३० हजार व्हायला दररोज बनवण्याचा आहे लक्ष

  – काही वेळेत या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देणार भेट

  – केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मिळवून दिला आहे या कंपनीला परवाना

  – हैद्राबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्स ला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

 • 06 May 2021 14:10 PM (IST)

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपुर, पुणे-अमरावतीसह पुणे रेल्वेच्या सुमारे 15 गाड्या रद्द

  पुणे –

  – पुणे रेल्वेच्या सुमारे 15 गाड्या रद्द,

  – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडॉउनमुळे प्रवासी संख्या झपाट्याने कमी झाली आहे,

  – त्यामुळे रेल्वेच्या सुमारे १५ गाड्या रद्द केल्याचे पुणे विभागाने कळविले आहे.

  – गुरुवारपासून २५ ते ३० जून दरम्यान या गाड्या बंद असतील,

  – मुंबई-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपुर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापुर-नागपुर, दादर-पंढरपुर, दादर- साईनगर शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापुर, मुंबई- बिदर, मुंबई-सोलापुर, मुंबई-लातूर एक्सप्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत,

  – परतीच्या मार्गांवरील या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

  – या गाड्या पुन्हा केव्हा सुरू होणार, याबाबत नंतर जाहीर करण्यात येईल, असही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट.

 • 06 May 2021 14:09 PM (IST)

  शिवसेना 500 बेडचे कोव्हिड सेंटर उभारणार, बाळासाहेब ठाकरे कोव्हिड सेंटर उद्यापासून सुरु

  बीड :

  शिवसेना 500 बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार

  बीडमध्ये बाळासाहेब ठाकरे कोव्हीड सेंटर उद्यापासून सुरू

  जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वखर्चातून उभारले कोव्हीड सेंटर

  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवेसना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री संदीपान घुमरे, चंद्रकांत खरे यांच्या हस्ते उदघाटन

  उद्या 12 वाजता कोव्हीड सेंटरचं उदघाटन

  कोरोना रुग्ण वाढत असल्याने शिवसेनेचा पुढाकार

 • 06 May 2021 14:04 PM (IST)

  कल्याणमध्ये लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी

  कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांनी लसीकरण केंद्रावर एकच गर्दी केली होती कल्याणच्या आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर मोठय़ा प्रमाणात लोक जमले होते. लोकांची भली मोठी रांग लागली आहे. काही गैर प्रकार होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी नागरीकांची धावपळ सुरु झाली आहे.

 • 06 May 2021 12:54 PM (IST)

  लिक्विड ऑक्सिजन हा सगळ्यात मोठा विषय, आम्ही केंद्राला अपील करणार – राजेश टोपे

  राजेश टोपे –

  – लिक्विड ऑक्सिजन हा सगळ्यात मोठा विषय, आम्ही अपील करु, केंद्राला अपील करणार

  – ५० टन टंचाई आहे, आम्ही केंद्राकडून मिळवून घेऊ

  – राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती, क आणि ड गटात १२ हजार पदांची भरती होणार

  – ए आणि ब मध्ये ४ हजार पदांची भरती होणार, लवकरच याबाबत आदेश निघणार

  – कोवॅक्सिन जी लस आहे त्याबाबत केंद्राने दुसरा डोज देणं हे आवश्यक आहे त्यांना दुसरा डोज दिलाच पाहीजे

  – ते देण्यासाठी आमचा पाठपुरावा केंद्राकडून सुरू, ते मिळवूनच घेऊ

  – याबाबत काल कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झाली

  – आपण जे कोवॅक्सिन खरेदी केलं ते कुणाला द्यायचं याचा विचार केला जाईल

  – कोवॅक्सिनचा दुसरा डोज मिळवायचा, नाही मिळाला तर भरपाई कळी करता येईल याचा विचार करू

  – ४२ दिवसापेक्षा जास्त दिवस कोवॅक्सिनचा डोज न देणं हे शास्रात नाही, ते देणं बंधनकारण

  – धोरणात्मक निर्णय घेऊ केवळ कोव्हॅक्सिनचा प्रश्न आहे

 • 06 May 2021 11:58 AM (IST)

  मराठा आरक्षण संदर्भात बीडमध्ये विनायक मेटे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

  बीड : मराठा आरक्षण संदर्भात बीडमध्ये महत्वाची बैठक

  आ. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

  कोव्हीडमुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू

  बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष

  मराठा समाजातील सर्व संघटना आणि महत्वाचे समन्वयक बैठकीला उपस्थित

 • 06 May 2021 11:47 AM (IST)

  स्थलांतरित केलेल्या मोकळ्या जागेतील भाजीविक्रेत्यांचे रॅपिड अँटिजन टेस्ट

  सोलापुर –

  स्थलांतरित केलेल्या मोकळ्या जागेतील भाजीविक्रेत्यांचे रॅपिड अँटिजन टेस्ट

  64 भाजीविक्रेत्यांची झाली तपासणी,64 जणांचे अहवाल निगेटिव्ह

  शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने पोलिसांची मोहीम

  प्रत्येक भाजीपाला विक्रेत्याची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात येणार

 • 06 May 2021 11:24 AM (IST)

  जे जे मार्ग परिसरात पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेटींग, दोन तासात 40 ते 50 जणांवर कारवाई

  – जे जे मार्ग परिसरात पोलिसांनी रस्त्यावर केली बॅरिकेटींग

  – विना कारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा…

  – प्रत्येक वाहनाची झाडाझडती सुरू

  – दोन तासात 40 ते 50 जणांवर कारवाई

  –  300 गाड्यांची तपासणी..

  – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस अॅक्शन मोडमध्ये

  – केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना रस्त्यावर फिरण्यास परवानगी

  – विनाकारण फिरणाऱ्यांना भरावा लागणार दंड

 • 06 May 2021 11:22 AM (IST)

  पुणे महापालिका 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडची उभारणी करणार

  पुणे

  पुणे महापालिका 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडची उभारणी करणार

  येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात करण्यात येणार 50 स्वतंत्र बेडची व्यवस्था

  त्यासाठी नऊ बालरोग तज्ज्ञांची भरती केली जाणार

  अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

 • 06 May 2021 10:44 AM (IST)

  सोलापुरात लसीकरण केंद्रांसमोर उडाला नियोजनाचा बोजवारा

  सोलापूर –

  लसीकरण केंद्रांसमोर उडाला नियोजनाचा बोजवारा

  शहरातील लसीकरण केंद्रासमोर मोठी गर्दी

  लसीकरण केंद्र समोरच उडत आहे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

  शहरात 17 ठिकाणी सुरू आहे लसीकरण

  लसीच्या तुटवड्यामुळे पाच दिवस ठप्प झालेली लसीकरण मोहीम काल पासून झाली आहे सुरु

  दुसऱ्या दिवशीही नागरिकांची गर्दी कायम

  लसीकरण केंद्रे गर्दीमुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता

 • 06 May 2021 10:38 AM (IST)

  तिवसा शहर आणि धारणी शहरात आजपासून कडक लॉकडाऊन

  अमरावती :

  अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट

  जिल्ह्यातील तिवसा शहर आणि धारणी शहरात आजपासून कडक लॉकडाऊन

  फळ विक्रेते,किराणा दुकान व भाजीपालांचे दुकानेही बंद राहणार

  मेडिकल व कृषी दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच राहणार सुरू

  तिवसा नगरपंचायत व धारणी नगरपंचायत क्षेत्रातील रहदारीचे सर्व रस्ते सील करण्याचे आदेश

  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय

 • 06 May 2021 10:14 AM (IST)

  औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला कोविशील्ड आणि कोव्हक्सिनचे डोस प्राप्त

  औरंगाबाद –

  औरंगाबादसह तीन जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी

  चार जिल्ह्यासाठी कोविशील्ड आणि कोव्हक्सिनचे डोस प्राप्त

  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी मिळाले डोस

  चार जिल्ह्यांसाठी मिळाले 44 हजार कोरोना लसींचे डोस

  काही दिवसांसाठी नागरिकांना मिळाला दिलासा

 • 06 May 2021 10:11 AM (IST)

  अक्कलकोट तालुक्याचा मृत्यूदर पाच टक्क्यांवर

  सोलापूर –

  अक्कलकोट तालुक्याचा मृत्यूदर पाच टक्क्यांवर

  लोक आजार अंगावर काढत असल्याने मृत्युदरात वाढ

  राज्याचा मृत्यूदर दीड तर सोलापूर जिल्ह्याचा दोन टक्क्यांवर

  मात्र अक्कलकोटचा मृत्युदर पाच टक्क्यावर

  तालुक्यात दररोज तीन ते पाच जणांचा मृत्यू

  आजाराला घाबरुन न जाता वेळेवर कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 • 06 May 2021 10:08 AM (IST)

  शिर्डीत लसीकरणासाठी नागरिकांची तोबा गर्दी

  शिर्डीत लसीकरणासाठी नागरिकांची तोबा गर्दी

  पहाटे 4 वाजेपासून लसीकरणासाठी रांगा

  कोपरगाव येथील लसीकरण केंद्रावर गर्दी वाढल्याने गोंधळ

  आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

  पोलिस बंदोबस्तात लसीकरणाला सुरुवात

  5 दिवसानंतर लस उपलब्ध झाल्याने आज लसीकरणाला सुरुवात

 • 06 May 2021 08:35 AM (IST)

  येवल्यात लॉकडाऊनचा फायदा घेण्यासाठी भुरटे चोर सक्रिय

  येवला –

  – लॉकडाऊनचा फायदा घेण्यासाठी भुरटे चोर सक्रिय

  – मध्यरात्रीच्या सुमारास शनी पटांगणातील श्रीकृष्ण मेडिकल फोडली

  – 15 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यानी चोरी करत केला हात साफ

  – चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  – येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  – सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांचे तपास सुरू

  – चोरीच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव व चेहरा दिसू नये म्हणून चोरट्याने तोंडावर मास्क आणि डोक्यात टोपी केली परिधान

 • 06 May 2021 07:58 AM (IST)

  माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेअंतर्गत घरोघरी जावून तपासणी सुरु

  रत्नागिरी –

  माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेअंतर्गत घरोघरी जावून तपासणी सुरु

  आजपर्यंत १ लाख २४ हजार ७१ जणांची तपासणी पुर्ण

  ८५ जण कोरोनाबाधित त्यापैकी २४ जणांना कोरोना सेंटरमध्ये केलं दाखल

  १ हजार १३३ आरोग्य पथके घरोघरी जावून करतायत तपासणी

 • 06 May 2021 07:57 AM (IST)

  नागपूरसह विदर्भात ॲाक्सिजन पुरवठ्यासाठी वायुसेनेची मदत

  – नागपूरसह विदर्भात ॲाक्सिजन पुरवठ्यासाठी वायुसेनेची मदत

  – ॲाक्सिजन आणण्यासाठी वायुदलाच्या विमानाने टॅंकर रवाना

  – ओदिशायेथील अंगुल येथे वायुदलाच्या विमानाने पोहोचले टॅंकर

  – येताना 20 तासांत रेल्वेने येणार ॲाक्सिजन टॅंकर

  – नागपूरसह विदर्भाला ॲाक्सिजन गरज

 • 06 May 2021 07:56 AM (IST)

  झाकीर हुसेन ऑक्सिजन गळती प्रकरणी चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

  नाशिक – झाकीर हुसेन ऑक्सिजन गळती प्रकरणी चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

  ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचे जीव गेल्याच अहवालात निष्कर्ष

  पंधरा दिवसांच्या मुदती आधीच चौकशी अहवाल शासनाकडे

  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार करून सादर

 • 06 May 2021 07:56 AM (IST)

  पुण्यात जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांचे पुण्यात येऊन उपचार घेण्याचे प्रमाण तब्बल 35-40 टक्के

  पुणे –

  – जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांचे पुण्यात येऊन उपचार घेण्याचे प्रमाण तब्बल 35-40 टक्के

  – एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या महिन्याभरात पालिकेच्या हद्दीबाहेरील 650 रुग्णांनी उपचार घेतलेत

  – या रुग्णांवर पालिकेलाच खर्च करावा लागत असून स्थानिक आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे

  – अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमधूनही कोरोना रुग्ण पुण्यात खासगी आणि पालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी येऊ लागले

  – स्थानिक नातेवाईकांचा पत्ता दाखवून हे रुग्ण उपचार घेऊ लागले आहेत

  – त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण आला आहे

 • 06 May 2021 07:54 AM (IST)

  नागपूर शहरात कोरोनाचा संसर्गदर 20 टक्क्यांपर्यंत खाली घसरला

  – नागपूर शहरात कोरोनाचा संसर्गदर 20 टक्क्यांपर्यंत खाली

  – ग्रामीणपेक्षा नागपूर शहरातील संसर्गदर अर्धा

  – गेल्या पाच दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या 10590 ने घटली

  – जिल्हयात रिकव्हरी रेट पोहोचला 82.92 टक्क्यांवर

  – पाच दिवसांत 25152 नवे रुग्ण, तर 35103 रुग्ण झाले कोरोनामुक्त

  – नागपूर जिल्हयात मृत्यूचा आकडा आजंही चिंताजनक

  – पाच दिवसांत जिल्हयात 440 कोरोना रुग्णांचा मृत्यू

 • 06 May 2021 07:51 AM (IST)

  नाशकात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 4110 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

  नाशिक –  कोरोना रुग्णसंख्येत पून्हा वाढ

  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत 4110 रुग्णांनी झाली वाढ

  तर 4279 रुग्ण कोरोना मुक्त

  दिवसभरात 47 जणांचा मृत्यू

  बळींची संख्या 3 हजार 692

  नाशिक ग्रामीण भागात लक्षणीय सुधार

  नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

  दिवसभरात 1892 नवे बाधीत, तर 17 बळी

  शहरात 2278 प्रतिबंधीत क्षेत्र

 • 06 May 2021 07:28 AM (IST)

  नाशकात टोसिलीझुमॅब इंजेक्शन चा कालाबाजार करणारी टोळी गजाआड

  नाशिक – टोसिलीझुमॅब इंजेक्शन चा कालाबाजार करणारी टोळी गजाआड

  नाशिक पोलिसांची कारवाई

  40 हजारांचे इंजेक्शन ची 4 लाखांना करत होते विक्री

  विक्री करणाऱ्या टोळीला 2 लाख 60 हजारांची रक्कम स्वीकारताना अटक

 • 06 May 2021 06:43 AM (IST)

  आष्टीत आज लसीकरण होणार नाही, पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आरोग्य विभागाचा निर्णय

  बीड :

  आष्टीत आज लसीकरण होणार नाही

  आष्टी आरोग्य विभागाचा निर्णय

  पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आरोग्य विभाग संतापले

  ओळखपत्र दाखवून ही डॉक्टरला पोलिसांकडून अमानुष मारहाण

  मराठवाड्यात सर्वात जास्त रुग्ण असताना पोलिसांची दादागिरी

  हेल्मेट सक्तीच्या नावाखाली मारहाण झाल्याने आरोग्य विभाग उद्या काम करणार नाही

  काम बंद आंदोलनामुळे नागरिकांची होणार परवड

 • 06 May 2021 06:38 AM (IST)

  राज्यात गेल्या 24 तासांत 57640 नव्या रुग्णांचे निदान, 920 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  राज्यात गेल्या 24 तासांत 57006 जण कोरोनामुक्त

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.32 टक्क्यांवर

  राज्यात 57640 नव्या रुग्णांचे निदान

  गेल्या 24 तासांत 920 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  राज्यात मृत्यूदर 1.49 टक्क्यांवर

 • 06 May 2021 06:37 AM (IST)

  पुण्यात गेल्या 24 तासांत 3260 कोरोना रुग्णांची वाढ

  – गेल्या 24 तासांत पुण्यात 3260 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – 3303 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधित 83 रुग्णांचा मृत्यू, 19रूग्ण पुण्याबाहेरील

  – 1415 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 436349 वर

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 39632 वर

  – एकूण मृत्यू -7118 वर

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण- 389499

 • 06 May 2021 06:36 AM (IST)

  वसई-विरारमध्ये गेल्या 24 तासात 897 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  वसई-विरार कोरोना अपडेट

  गेल्या 24 तासात 897 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  तर आज दिवसभरात 14 जणांचा मृत्यू

  दिवसभरात 682 जणांनी केली कोरोनावर मात

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57,134 वर

  कोरोना मुक्त झालेली रुग्णसंख्या 44,849 वर

  आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1155 वर

  कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या- 11130

 • 06 May 2021 06:35 AM (IST)

  ठाण्यात गेल्या 24 तासांत 1,093 रुग्ण कोरोनातून बरे, 552 नव्या रुग्णांची नोंद

  ठाणे कोरोना अपडेट

  गेल्या 24 तासांत 1,093 रुग्ण कोरोनातून बरे

  तर 552 जणांना कोरोनाची बाधा

  आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण  रुग्ण- 1,21,477

  कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 1,12,147

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.3 टक्क्यांवर

  7,605 रुग्णांवर सध्या उपचार सुरु

  गेल्या 24 तासांत 9 जणांचा मुत्यू झाला,

  आतापर्यंत कोरोनामुळे 1,725 जणांचा मृत्यू

 • 06 May 2021 06:27 AM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 783 नवे रुग्ण

  उस्मानाबाद  कोरोना अपडेट

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 783 रुग्ण आढळले

  दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 487 जणांना डिस्चार्ज देण्यात आला

  उस्मानाबाद तालुका 310, तुळजापूर 46,उमरगा 62, लोहारा 84, कळंब 103, वाशी 88, भूम 48 व परंडा 42 रुग्ण

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7183 सक्रिय रुग्ण

  जिल्ह्यात एकूण 33 हजार 720 रुग्ण बरे 81.45 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

  आतापर्यंत एकूण 981 जणांचा मृत्यू

  जिल्ह्यात 2.32 टक्के मृत्यू दर