श्रीनगर-शारजाह विमानासेवेसाठी मार्ग मोकळा करावा, भारताने पाकिस्तानला केली विनंती

पाकिस्तानने मंगळवारी श्रीनगर-शारजाह (Shrinagar-Sharjah) विमानाला आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारली होती. यामुळे विमाना शारजाह, यूएईमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातद्वारे लांबचा प्रवास करावा लागला.  गो फर्स्टने (GoFirst) 23 ऑक्टोबरपासून श्रीनगर आणि शारजाह दरम्यान थेट उड्डाणे सुरू केली होती.

श्रीनगर-शारजाह विमानासेवेसाठी मार्ग मोकळा करावा, भारताने पाकिस्तानला केली विनंती


नवी दिल्ली: गोफर्स्ट एअरलाइन्सच्या (GOFirst Arlines) श्रीनगर-शारजाह विमानसेवेला ओव्हरफ्लाइट क्लिअरन्स देण्यासाठी भारताने पाकिस्तानला विनंती केली आहे. ज्यांनी या मार्गाच्या विमानाचे तिकीट काढले आहे अशा लोकांचं नुकसान होऊ नये आणि प्रवाशांचं हित लक्षात घेऊन ओव्हरफ्लाइट क्लिअरन्स द्यावा, अशी विनंती भारताने पाकिस्तानला केली आहे. पीटीआय वृत्तसंथेने ही बातमी दिली आहे. (India requests to Pakistan for overflight space clearance for GoFirst Shrinagar Sharjah flights)

पाकिस्तानने मंगळवारी श्रीनगर-शारजाह विमानाला आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारली होती. यामुळे विमाना शारजाह, यूएईमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातद्वारे लांबचा प्रवास करावा लागला.  गो फर्स्ट, पूर्वीचे गोएअरने (GoAir), 23 ऑक्टोबरपासून श्रीनगर आणि शारजाह दरम्यान थेट उड्डाणे सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यात काशमीर भेटीदरम्यान या सेवेचे उद्घाटन केले होते.

आठवड्यातून चार वेळा ही विमाना सेवा आहे आणि 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानची हवाई हद्द वापरताना कोणतीही समस्या आली नाही. मात्र, पाकिस्तानने 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी या विमानाला परवानगी दिलेली नाही. पाकिस्तान सरकारने विमानाला परवानगी नाकारण्याचे कोणतेही विशेष कारण अद्याप दिलेले नाही, असे एका अधिकाऱ्यांनी पीटीआय सांगितले.
गो फर्स्टने या विषयावर अद्याप कोणतेही विधान केलेली नाही.

श्रीनगर-शारजाह-श्रीनगर एअरलाइन्स सेवा ही जम्मू-काश्मीर आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) दरम्यान 11 वर्षांनंतरची पहिली सेवा आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीनगर-दुबई उड्डाण सुरू केले होते, पण काही काळानंतर बंद करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी ट्विट केले, खूप दुर्दैवी. पाकिस्तानने 2009-10 मध्ये श्रीनगर ते दुबईला एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला असेच केले होते. मला आशा होती की गो फर्स्टला परवानगी दिली जाईल.

केंद्राला दोष देताना, पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी ट्विट केले, आश्चर्यकारक आहे की भारत सरकार श्रीनगरहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पाकिस्तानकडून त्यांची हवाई हद्द वापरण्याची परवानगी घेण्याची तसदी घेत नाही.

Other News

Muhurat Trading Updates: अखेर मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा दिवस

Diwali 2021: भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI