AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2021: भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई

भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर गुरुवारी मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.

Diwali 2021: भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई
Indian Soldiers exchanging sweets with Pakistan Rangers at border today
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 7:46 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर गुरुवारी मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे. (Indian army soldiers exchange sweets with Pakistani Bangalesh soldiers on occasion of Diwali festival at international borders)

गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.

बीएसएफच्या जवानांनी बुधवारी रात्री भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) सोबतपण सण साजरा करण्यासाठी मिठाईची देवाणघेवाण केली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुवाहाटी सीमा रक्षकांनी भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) सोबत मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली ,” गुवाहाटी फ्रंटियर (BSF) च्या अधिकृत हँडलने ट्विट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.  मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल सैनिकांचे कौतुक केले आणि देशाला जवानांचा अभिमान वाटतो, असं म्हणाले. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

Other News

DIWALI in USA: अमेरिकेत लवकरच दिवाळीची सार्वजनिक सुट्टी घोषित होणार; ऐतिहासिक विधेयक सादर होतानाचा बघा VIDEO

Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.