AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प खोटारडे… भारताचा अमेरिकेला दणका, ‘तो’ दावा फेटाळला

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे सुमारे 40 टक्के कमी करणार असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचे आश्वासन दिले असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.भारत सरकारने यावर उत्तर दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प खोटारडे... भारताचा अमेरिकेला दणका, 'तो' दावा फेटाळला
Narendra-Modi-and-Donald-Trump
| Updated on: Oct 23, 2025 | 3:20 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर दुहेरी शुल्क लादले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे सुमारे 40 टक्के कमी करणार असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचे आश्वासन दिले असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आता भारत सरकारने ट्रम्प यांच्या या दाव्यावर उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करणार – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, भारताकडून सांगण्यात आले आहे की ते या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी तेल आयात 40 टक्के कमी करणार आहे. अचानक तेल खरेदी थांबवता येणार आहे. यासाठी एक प्रक्रिया आहे. हळू हळू भारत तेल खरेदी कमी करून ती शुन्यावर आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

भारत सरकारने दिले उत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला उत्तर देताना भारताने म्हटलं की, ‘आमच्या ऊर्जा धोरणाचे उद्दिष्ट देशातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. स्थिर किंमत नियमित आणि सुरक्षित पुरवठा याला देशाचा पाठिंबा आहे. आम्ही देशाच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन तेल खरेदी कोणत्या देशाकडून करायचे याचा निर्णय घेतला जातो.’ याचा अर्थ भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा दावा फेटाळला आहे.

अमेरिकेचा भारतावर दबाव

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यातील 25 टक्के कर हा रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लादण्यात आला आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच अमेरिकेने भारताला अनेकदा रशियाकडून तेल खरेदी न करण्याचं आवाहन केले आहे. तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे कमी न केल्यास भारतावर आणखी शुल्क लावले जाण्याचाही इशारा अमेरिकेने दिला आहे. मात्र भारताने वारंवार रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यास नकार दिलेला आहे. आताही भारताने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...