अन् काळजाचा ठोकाच चुकला… तामिळनाडूमध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
Air Force Plane Crash: तामिळनाडू मधील तांबरम येथे उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे पिलाटस प्रशिक्षण विमान कोसळले आहे. या घटनेत पायलट सुरक्षित आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तामिळनाडूमधून मोठी बातमी समोर आली आहे. तांबरम येथे उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे पिलाटस प्रशिक्षण विमान कोसळले आहे. अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असताना हे विमान कोसळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाची गोष्ट म्हणजे या विमानाचा पायलट सुरक्षित आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तामिळनाडूमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले
समोर आलेल्या माहितीनुसार, तांबरम हवाई दलाच्या तळाजवळ ही घटना घडली. पिलाटस पीसी-7 एमके-2 हे प्रशिक्षण विमान नवीन पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते. हेच प्रशिक्षण सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र या विमानाचा पायलट सुरक्षित आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश दिले आहेत.
विमान जमिनीवर आदळले
आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता हा अपघात झाला आहे. उड्डाण घेत असताना विमानात बिघाड झाल, त्यामुळे पायलटने इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र याच प्रयत्नात विमान जमिनीवर आदळले. मात्र कमी उंची असल्याने विमानाला आग लागली नाही आणि पायलट स्वतःहून विमानातून बाहेर पडला.
#WATCH | One PC-7 Pilatus basic trainer aircraft of the Indian Air Force on a routine training mission crashed near Tambram, Chennai. Pilot safely ejected. A Court of Inquiry to ascertain the cause has been ordered: Indian Air Force
(Visuals from the spot) pic.twitter.com/hL2q3HH3jn
— ANI (@ANI) November 14, 2025
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी 1:45 वाजता या विमानाने उड्डाण केले. या विमानात नवीन पायलटला मूलभूत उड्डाण कौशल्ये शिकवली जात होती. मात्र दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विमान अचानक कोसळले. या घटनेनंतर लोकांना मोठा आवाज ऐकू आला आणि मोठ्या प्रमाणात धूर दिसला. त्यानंतर हवाई दलाची पथके आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. या घटनेत पायलटला किरकोळ दुखापत झाली होती, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताची चौकशी होणार
या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. हे विमान रिकाम्या ठिकाणी कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात कोणतेही नुकसान झाले नाही. या अपघाताबाबत हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पायलटने तत्परता दाखवत आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करून स्वतःला वाचवले. विमानातील तांत्रिक बिघाडाचे कारण काय होते याचा तपार आम्ही करणार आहोत.
