पाकिस्तानसाठी काळ ठरणार हे AI वरील नवीन शस्त्र, 14 हजार फूट उंचीवरही शत्रूचा करणार खात्मा
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय शस्त्रांची ताकद दिसली. भारतापुढे पाकिस्तानची शस्त्रे टिकली नाही. आता एआय बेस शस्त्र आल्यामुळे ज्या भागात मानवी सैन्य पोहचू शकत नाही, त्या ठिकाणी या शस्त्राचा वापर करता येणार आहे.

भारतीय लष्करात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. काळानुसार भारतीय संरक्षण विभाग नवनवीन आधुनिक प्राणालीचा वापर करत आहे. सर्व प्रकारची नवे शास्त्रास्त्रे भारतीय सैन्याला दिली जातात. आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचाही (एआय) वापर केला जात आहे. भारताने एआय बेस शस्त्राची चाचणी घेतली आहे. त्याचा भारतीय सैन्यात लवकरच समावेश करण्यात येणार आहे. डेहराडून येथील बीएसएस मेटेरियल कंपनीने 14,000 फूट उंचीवर एडवान्स AI-आधारित ऑटोनोमस लीथल व्हेपन सिस्टम Negev LMG ची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी भारतीय सैन्य दलासोबत करण्यात आली आहे.
Negev LMG मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा समावेश केला आहे. शत्रूची ओळख करुन स्वत:च फायरींग करण्याची त्याची क्षमता आहे. दुर्गम आणि उंच भागात या शस्त्राची परिणामकारकता तपासण्यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. हे तंत्रज्ञान भविष्यात युद्धात महत्वाची भूमिका बजावणार आहे. ज्या भागांत मानवी सैनिकांची नियुक्ती करणे शक्य नाही, त्या ठिकाणी या शस्त्राचा वापर करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील युद्धात महत्वाची भूमिका बजावणार आहे. भारतीय लष्कर आणि देशातंर्गत संरक्षण कंपनीने मिळून केलेली ही मेक इन इंडिया चाचणी आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय शस्त्रांची ताकद दिसली. भारतापुढे पाकिस्तानची शस्त्रे टिकली नाही. आता एआय बेस शस्त्र आल्यामुळे ज्या भागात मानवी सैन्य पोहचू शकत नाही, त्या ठिकाणी या शस्त्राचा वापर करता येणार आहे. या शस्त्राच्या नियुक्तीनंतर शत्रूला कोणत्याही भागातून घुसखोरी करणे शक्य होणार नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने लष्कराने अलिकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे. बीएसएफकडून सीमेवरील कुंपण अद्ययावत केले जाणार आहे. जिथे जिथे सीमेवरील कुंपण जुने झाले आहे तिथे तिथे नवीन कुंपण बसवले जाणार आहे. तसेच सीमेवरील ज्या ठिकाणी जुने कुंपण आहे, त्या ठिकाणी बीएसएफ जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सीमेवर प्रत्येक ठिकाणी हा बदल केला जाईल. काळानुसार सैन्य बदल करत आहे.
