AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shyok River Accident Ladakh : लडाखमध्ये लष्कराचं वाहन खोल नदीत कोसळलं, 7 जवान मृत्यूमुखी, अनेक जवान गंभीर जखमी

Shyok River Accident news in Ladakh भारतीय लष्करासंबंधी एक धक्कादायक बातमी आहे. लडाखमध्ये श्योक नदीत लष्कराचं वाहन कोसळलं. या दुर्घटनेत 7 जवानांचा मृत्यू झाला आहे.

Shyok River Accident Ladakh : लडाखमध्ये लष्कराचं वाहन खोल नदीत कोसळलं, 7 जवान मृत्यूमुखी, अनेक जवान गंभीर जखमी
लष्कराचं वाहन लडाखमधील श्योक नदीत कोसळलंImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 27, 2022 | 5:09 PM
Share

लडाख : भारतीय लष्करासंबंधी (Indian Army) एक धक्कादायक बातमी आहे. लडाखमध्ये श्योक नदीत लष्कराचं वाहन कोसळलं. या दुर्घटनेत 7 जवानांचा मृत्यू झाला आहे. लडाखच्या (Ladakh) तुर्तक भागात सैन्यदलाची गाडी श्योक नदीत पडली. यात 7 जवान शहीद (martyr) आणि काही जवान जखमी झाले आहेत. इंडियन आर्मीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे, 26 जवानांची एक तुकडी परतापूरच्या हनीफ सेक्टरवरुन फॉरवर्ड पोस्टला जात होती. लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे वाहन गुरुवारी श्योक नदीत पडले, या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला.

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘परतापूरच्या संक्रमण शिबिरातून 26 जवानांचा एक तुकडी उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. वाहन सुमारे 50-60 फूट खाली नदीत पडले. 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 26 पैकी 7 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

Shyok River

श्योक नदी

गंभीर जखमी जवान रुग्णालयात दाखल

सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 25 किलोमीटर अंतरावर लष्कराचं वाहन शोक्य नदीत कोसळले. यातील 26 गंभीर जखमी जावानांना अपघातानंतर तातडीने आर्मी फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यात गंभीर जखमी झालेल्या 7 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. लेहवरुन परतापूरसाठी सैन्याच्या सर्जिकल टीम रवाना करण्यात आल्या आहेत. गंभीर जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमानच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

जवानांच्या मदतीसाठी एअर फोर्सशी संपर्क

गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी एअर फोर्सशी संपर्क साधण्यात आलाय. त्यांना उपचारासाठी वेस्टर्न कमानला पाठवण्यात येईल. सैन्याची बस कोणत्या कारणामुळे रस्त्यावरुन घसरून नदीत कोसळली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत सैन्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार जवानांची बस ट्रान्झिट कॅम्पवरुन सब सेक्टर हनीफकडे निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर