AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron : …तर जिल्हास्तरावर लावले जाणार निर्बंध, आयसीएमआरनं दिली महत्त्वाची माहिती

सध्याच्या कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातंय, असं आयसीएमआर(Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी सांगितलंय. जिथं कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट (Covid Positivity Rate) ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील, असंही ते म्हणाले.

Omicron : ...तर जिल्हास्तरावर लावले जाणार निर्बंध, आयसीएमआरनं दिली महत्त्वाची माहिती
बलराम भार्गव, डीजी, आयसीएमआर
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 5:31 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक परिस्थिती लक्षात घेता देशातल्या सध्याच्या कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातंय, असं आयसीएमआर(Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी सांगितलंय. जगभरातल्या जगभरात ओमिक्रॉन(Omicron)च्या प्रसार वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबतची माहिती दिली.

‘नियमित बैठका’ ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर त्यांनी अधिकृत निवेदन सादर केलंय. त्यात त्यांनी नमूद केलंय, की जिथं कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट (Covid Positivity Rate) ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील. ओमिक्रॉनचा धोका आणि त्यासंबंधी जागृती करण्यासंदर्भात नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

उड्डाणं रद्द

ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवलीय. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिके(South Africa)त आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.

राज्यातली काय स्थिती?

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित 10  रुग्ण असून त्यापैकी 7 पुणे जिल्ह्यात आहेत. हे सर्व रुग्ण लक्षणं नसलेली अथवा कमी लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्यात लसीकरण(Vaccination)चा वेग वाढविण्यात आलाय. मागील 10 दिवसात 8 लक्ष लसीकरण करण्यात आलं असून त्यापैकी पहिली मात्रा 33 टक्के तर 67  टक्के दुसरी मात्रा देण्यात आलीय. जिल्ह्यानं लसीकरणात 1  कोटी 38  लाखाचा टप्पा पार केला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या 19 हजार 174 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

धक्कादायक! अहमदनगरला निघालेल्या 22 पैकी 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह! काय आहे बीडमधील कोरोनाची स्थिती?

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा; बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने घेणे आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

Omicron Maharashtra Update : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, पुण्यासह पिंपरीतील 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांसंदर्भात महत्त्वाची अपडेट

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.