भारतीय रेल्वे विनेश फोगाटचा राजीनामा स्विकार करणार?; मोठी अपडेट वाचा…
Vinesh Phogat Bajrang Punia : विनेश फोगाट-बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. विनेशचा राजीनामा स्विकार करणार? तिच्या नोटीस पिरियडचं काय होणार? पीटीआयची बातमी काय? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर या दोघांनीही भारतीय रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मंजूर करून घेण्याच्या प्रक्रियेला भारतीय रेल्वेने सुरुवात केली आहे. पीटीआय या न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिलं आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना लवकरच पदमुक्त केलं जाणार आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असं रेल्वेतील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.
विनेश- बजरंग यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर काही तासातच विनेश आणि बजरंग यांच्या उमेदवारीची घोषण काँग्रेसने केली आहे. विनेशला काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं आहे. जुमाना या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विनेशला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर बजरंगला भारतीय शेतकरी काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे.
विनेशच्या राजीनाम्याचं काय होणार?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणूक लढवण्याआधी तुम्हाला तुमच्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो. तसं विनेशने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला 3 महिन्याचा नोटीस पिरीयड असतो. मात्र या केसमध्ये नोटीस पिरियडचा नियम बाजूला ठेवण्यात येणार असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.
विनेशने पॅरिस ऑल्मिपिकमध्ये चमकदार कामगिरी केली. सुवर्णपदाचं स्वप्न फक्त काही पावलं दूर असताना तिला खेळातून बाहेर पडावं लागलं. फायनल मॅचआधी 100 ग्रॅम अधिक वजन असल्याने ती खेळू शकली नव्हती. मात्र संपूर्ण देशाने तिला पाठिंबा दिला होता. अशात ऑलिम्पिकनंतर विनेशने राजकीय करिअरची सुरुवात केली आहे. तिने नुकतंच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर रेल्वेतील OSD पदाचा तिने राजीनामा दिला आहे. आता तिचा राजीनामा स्विकार केला जाणार की नाही? यावरून तिला निवडणूक लढता येईल की नाही याबाबत स्पष्टता येईल.
