फोटो फिचर: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आज ‘या’ एक्सप्रेस रद्द; घरातून निघताना लिस्ट चेक करा

पश्चिम रेल्वेने आज 20 एप्रिल रोजी एक ट्विट केलं असून काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. (Indian Railways cancelled trains from 19 and 20 april, check full list)

फोटो फिचर: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आज 'या' एक्सप्रेस रद्द; घरातून निघताना लिस्ट चेक करा
Indian Railway
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 10:27 AM

नवी दिल्ली: पश्चिम रेल्वेने आज 20 एप्रिल रोजी एक ट्विट केलं असून काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. काही स्पशेल ट्रेन रद्द करण्यात आल्या असून पुढील आदेश येईपर्यंत या ट्रेन रद्द राहतील असं रेल्वेने म्हटलं आहे. (Indian Railways cancelled trains from 19 and 20 april, check full list)

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी अनेक प्रकारची बंधनं घातली आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालयांवरही ताण आला आहे. भारतीय रेल्वेने दिल्लीत ट्रेनचे कोच आयसोलेशन आणि कोविड सेंटर म्हणून वापरण्यास दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रेल्वेने 19 आणि 20 एप्रिल पर्यंत काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याची ही लिस्ट पाहा.

Indian Railway

Indian Railway

पश्चिम रेल्वेने ट्विट करून रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि समाप्त होणाऱ्या काही स्पेशल ट्रेन पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. सूरत, जामनगर, भोपाळ, वडोदरा, वेरावल आणि दाहोदला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Indian Railway

Indian Railway

20 एप्रिलपासून रद्द होणाऱ्या ट्रेनमध्ये 09257 अहमदाबाद-वेरावल स्पेशल, 09008 भुसावळ-सूरत स्पेशल, 09077 नंदुरबार-भुसावळ स्पेशल, 09339 दाहोद-भोपाळ स्पेशल, 09324 भोपाळ- आंबेडकर नगर स्पेशल ट्रेनचा समावेश आहे.

Indian Railway

Indian Railway

19 एप्रिलपासून रद्द होणाऱ्या गाड्या- 09007 सूरत- भुसावळ स्पेशल, 02959 वडोदरा-जामनगर सुपरफास्ट स्पेशल, 02960 जामनगर – वडोदरा सुपरफास्ट स्पेशल, 09258 वेरावल-अहमदाबाद स्पेशल, 09323 डॉ. आंबेडकर नगर-भोपाळ स्पेशल, 09340 भोपाळ-दाहोद स्पेशल.

Indian Railway

Indian Railway

वेस्टर्न रेल्वेने काही स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यात वांद्रे टर्मिनस से गोरखपूर, मुंबई सेंट्रल- मंडुआडीह- दादर, वांद्रे टर्मिनसहून भगत की कोठी आणि अहमदाबाद-दानापूरसाठी गाड्या चालवण्यात येतील. या गाड्यांसाठी 20 आणि 21 एप्रिलपर्यंत तिकीट बुकिंग सुरू राहील. (Indian Railways cancelled trains from 19 and 20 april, check full list)

संबंधित बातम्या:

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा, कैद्याचा तुरुंगात कोरोनाने मृत्यू

ICSE board exam: कोरोनाच्या धोक्यामुळे ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

Tanmay Fadanvis | ‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

(Indian Railways cancelled trains from 19 and 20 april, check full list)

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.