Indian railway : भारतीय रेल्वेच्या नावावर आहेत हे पाच जागतिक रेकॉर्ड, ऑस्ट्रेलिया-ब्रिटनलाही टाकले मागे

दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड मिळून जेवढा ट्रॅक आहे तेवढा भारताने गेल्या वर्षी तयार केला. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने नवनवीन रेकॉर्ड तयार केले आहेत.

Indian railway : भारतीय रेल्वेच्या नावावर आहेत हे पाच जागतिक रेकॉर्ड, ऑस्ट्रेलिया-ब्रिटनलाही टाकले मागे
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 3:33 PM

Indian Railway World Record : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमृत भारत योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दक्षिण ऑफ्रिका, युक्रेन, पोलंड, युके आणि स्वीडनमध्ये असलेल्या रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त मोठा नेटवर्क हा गेल्या ९ वर्षांत भारतीय रेल्वेने तयार केला. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड मिळून जेवढा ट्रॅक आहे तेवढा भारताने गेल्या वर्षी तयार केला. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने नवनवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. आता आपण जाणून घेऊया भारताने कोणकोणते रेकॉर्ड जगात तयार केले आहेत.

जगातील सर्वात लांब रेल्वेस्टेशन भारतात

भारताने जगात सर्वात लांब रेल्वेस्टेशन तयार करण्याचा रेकॉर्ड दोन वेळा केला आहे. गोरखपूर रेल्वे स्टेशन जगात सर्वांत लांब रेल्वेस्टेशन होता. त्याची लांबी १३६६.४ मीटर आहे. मार्च २०२३ मध्ये भारताने स्वतःचा रेकॉर्ड मोडून दक्षिण-पश्चिम रेल्वे झोनचा हुबळी रेल्वेस्टेशन देशातील सर्वात लांब रेल्वेस्टेशन तयार केला. २० कोटी रुपये खर्च करून या रेल्वेस्टेशनची लांबी १५०७ मीटर करण्यात आली. या रेल्वेस्टेशनच्या लांबीची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये करण्यात आली.

कालका-शिमला रेल्वेस्थानकाची विशेषता

२००३ मध्ये कालका-शिमला रेल्वेला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये सहभागी करून घेतलं. ९६ किलोमीटर लांब प्रवास उंच भागातून करणाऱ्या कालका-शिमला ट्रेनला हा रेकॉर्ड देण्यात आला. ही ट्रेन २२ किलोमीटर प्रतीतास धावते. २००८ मध्ये युनेस्कोने या ट्रेनला वर्ल्ड हेरिटेजमध्ये सहभागी केले.

ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडच्य लोकसंख्येपेक्षा जास्त भारतीय रेल्वे प्रवासी

ऑट्रेलियातील लोकसंख्येपेक्षा जास्त भारतात रेल्वेने प्रवास करणारे लोकं आहेत. भारतीय रेल्वेने रोज सुमारे तीन कोटी लोकं प्रवास करतात. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या २ कोटी ५७ लाख आहे.

जगातील चौथा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क भारतात

भारतीय रेल्वेजवळ ६८ हजार किलोमीटर असलेला जगातील चौथा सर्वात लांब रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताने हा रेकॉर्ड प्राप्त केला आहे. सध्या देशात ७ हजारपेक्षा अधिक रेल्वेस्थानक आहेत. १३ हजारांपेक्षा अधिक पॅसेंजर ट्रेन आहेत. ४५ हजार किलोमीटर लांब इलेक्ट्रिक रेल्वे नेटवर्क आहे.

जगातील १० व्या क्रमांकाचा रोजगार देणारा नेटवर्क

भारतीय रेल्वेजवळ १३ लाख रेल्वे कर्मचारी आहेत. रोजगार देण्याच्या बाबतीत देशात रेल्वे अग्रेसर आहे. जगात दहाव्या क्रमांकावर भारतीय रेल्वे रोजगार उपलब्ध करून देतो.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.