AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway Rights: ट्रेनमध्ये चढताच मोफत मिळतात या सात सुविधा, अनेकांना माहीत नाही रेल्वेच्या सुविधा

Indian Railway interesting Rules: अनेक जण रोजच रेल्वे प्रवास करतात. परंतु अनेकांना रेल्वे तिकिटासोबत मिळणाऱ्या मोफत सुविधांची माहिती नाही. रेल्वेत बसल्यावर प्रवाशांचे काय अधिकार आहे, त्याची माहिती असणे गरजेचे आहे.

Indian Railway Rights: ट्रेनमध्ये चढताच मोफत मिळतात या सात सुविधा, अनेकांना माहीत नाही रेल्वेच्या सुविधा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 06, 2025 | 3:09 PM
Share

Indian Railway interesting Rules: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. अनेक जण रोजच रेल्वे प्रवास करतात. परंतु अनेकांना रेल्वे तिकिटासोबत मिळणाऱ्या मोफत सुविधांची माहिती नाही. रेल्वेत बसल्यावर प्रवाशांचे काय अधिकार आहे, त्याची माहिती असणे गरजेचे आहे.

  1. रेल्वेच्या सर्व AC कोचमध्ये मोफत बेडरोल्सची सुविधा दिले जाते. त्यात एक कंबल, एक उशी, दोन चादरी आणि फेस टॉवलचा समावेश आहे. तुम्ही जर 1AC, 2AC आणि 3AC कोचमधून प्रवास करत असाल तर या सुविधा मोफत मिळतील. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये बेडरोलसाठी 25 रुपये वेगळे द्यावे लागतात. काही रेल्वेत तिकीट बुकींग करताना गरजेनुसार स्लीपर क्लासमध्येही बेडरोल घेऊ शकतात. जर तुम्हाला ही सुविधा दिली नाही आणि तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला 20 रुपये रिफंड मिळणार आहे.
  2. रेल्वे प्रवासात तुम्ही प्रवास करताना आजारी पडले तर त्याची माहिती फ्रंट लाइन कर्मचारी, TTE, ट्रेन सुपरिटेंडेंट यांना द्यावी. त्यानंतर ते First AID ची मदत देतात. गरज पडली तर मेडिकल असिस्टेंससुद्धा दिले जाईल. तसेच गरजेनुसार पुढच्या स्टॉपेजवर शुल्क घेऊन मेडिकल ट्रिटमेंटची सुविधा मिळतील. प्रकृती जास्त खराब असेल तर रुग्णालयात दाखल केले जाते.
  3. दुरंतो आणि शताब्दीसारखी प्रीमियम रेल्वे निर्धारित स्टेशनवर दोन तासापेक्षा जास्त उशिराने धावत असल्यावर तुम्हाला रेल्वेकडून मोफत जेवण दिले जाते.
  4. रेल्वे स्टेशनवर क्लॉक रूम आणि लॉकर रूमची व्यवस्था आहे. या ठिकाणी तुम्ही एक महिना सामान ठेवू शकता. त्यासाठी मात्र निर्धारित केलेले शुल्क द्यावे लागेल.
  5. तुमची ट्रेन लेट आहे आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवर लवकर पोहचले तर वेटिंग रुमची सुविधा दिली आहे. प्रवाशी आपल्या तिकिटानुसार एसी किंवा नॉन एसी वेटिंग हॉलमध्ये थांबू शकता.
  6. तुम्हाला दोन ते चार तास थांबण्यासाठी सुविधा हवी असेल तर रिटायरिंग रूमची सुविधा आहे. रेल्वे प्रवाशांसाठी 48 तास थांबण्याची सुविधा या ठिकाणी आहे. तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर जावून रिटायरिंग रुमची बुकींग करु शकतात.
  7. रेल्वेत कोणतीही मदत हवी असेल तर 139 या क्रमांकावर कॉल करु शकतात. तसेच ट्रेन स्वच्छ नसणे, बाथरूम खराब असणे, चोरी यासाठी www.pgportal.gov.in या पोर्टलवर तक्रार करु शकतात. हेल्पलाइन नंबर 9717630982 किंवा या टेलिफोन नंबर 011-23386203 वर कॉल करु शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?