व्हिसाशिवाय फक्त पासपोर्टवर या 62 देशांमध्ये जाऊ शकतात भारतीय, नावं तर पाहा!

भारतातील लोकांना व्हिसाशिवाय जगातील 62 देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो. पासपोर्ट निर्देशांकात भारत 80 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान तळापासून चौथ्या आणि अफगाणिस्तान तळाशी आहे.

व्हिसाशिवाय फक्त पासपोर्टवर या 62 देशांमध्ये जाऊ शकतात भारतीय, नावं तर पाहा!
INDIAN VISAImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 7:43 PM

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : भारताच्या पासपोर्टची ताकद जगात झपाट्याने वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोणत्याही देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. ज्या देशाचा पासपोर्ट अधिक मजबूत असतो त्या देशातील नागरिकांना इतर देशांमध्ये फिरण्यास अडचण येत नाही. 2022 मध्ये जगभरातील 199 देशांपैकी भारताचा पासपोर्ट रँकिंग क्रमांक 87 होता. मात्र, 2023 च्या अखेरीस हा रँकिंग क्रमाक 80 वर आला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना आता सुमारे 62 देशांमध्ये फक्त पासपोर्टवर फिरता येणार आहे. यासाठी त्यांना व्हिसा घेण्याची गरज भासणार नाही.

लंडनच्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार पाकिस्तान पासपोर्टची स्थिती अत्यंत खराब आहे. जगातील देशांच्या यादीत पाकिस्तान खालून चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी नागरिकांना केवळ 34 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकतो. तर, या यादीत सर्वात शेवटचा नंबर आहे तो अफगाणिस्तान देशाचा. येथील नागरिक व्हिसाशिवाय केवळ 28 देशांना भेट देऊ शकतात.

सीरियाचे लोक 29 देशांमध्ये जाऊ शकतात तर इराकच्या नागरिकांना 31 देशांमध्ये जाण्याची परवानगी आहे. त्याचवेळी जगातील 10 सर्वात वाईट क्रमांकावर असलेल्या पासपोर्ट देशांमध्ये नेपाळ, पॅलेस्टाईन, सोमालिया, येमेन, इराक, सीरिया, अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान आणि लिबिया यांचा समावेश आहे.

जगभरातील फक्त 6 देश असे आहेत की येथील नागरिक व्हिसाशिवाय 194 देशांना भेट देऊ शकतात. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन यांचा या यादीत समावेश आहे. यानंतर फिनलंड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्स हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याखाली बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल आणि युनायटेड किंगडम हे चौथ्या स्थानी आहेत. या देशांचे नागरिक एकूण 191 देशांना भेट देऊ शकतात.

भारतीय नागरिक या 62 देशांना देऊ शकतात व्हिसाशिवाय भेट…

1. अंगोला

2. बार्बाडोस

3. भूतान

4. बोलिव्हिया

5. ब्रिटिश व्हर्जिन बेटे

6. बुरुंडी

7. कंबोडिया

8. केप वर्दे बेटे

9. कोमोरो बेटे

10. कुक बेटे

11. जिबूती

12. डोमिनिका

13. एल साल्वाडोर

14. इथिओपिया

15. फिजी

16. गॅबॉन

17. ग्रेनेडा

18. गिनी बिसाऊ

19. हैती

20. इंडोनेशिया

21. इराण

22. जमैका

23. जॉर्डन

24. कझाकस्तान

25. केनिया

26. किरिबाती

27. लाओस

28. मकाऊ

29. मादागास्कर

30. मलेशिया

31. मालदीव

32. मार्शल बेटे

33. मॉरिटानिया

34. मॉरिशस

35. मायक्रोसिया

35. मोन्सेरात

36. मोझांबिक

37. म्यानमार

38. नेपाळ

39. नियू

40. ओमान

41. पलाऊ बेट

42. कतार

43. रवांडा

44. सामोआ

45. सेनेगल

46. ​​सेशेल्स

47. सिएरा लिओन

48. सोमालिया

49. श्रीलंका

50. सेंट किट्स आणि नेव्हिस

51. सेंट लुसिया

52. सेंट व्हिन्सेंट

53. टांझानिया

54. थायलंड

55. तिमोर

56. टोगो

57. त्रिनिदाद आणि टोबॅगो

58. ट्युनिशिया

59. तुवालू

60. वानुआतू

61. झिम्बाब्वे

62. ग्रेनेडा

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.