भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, अमेरिकेची चिंता वाढली
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले असून, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, त्यामुळे ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे.

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्याचा सध्या दोन्ही देशांना देखील फटका बसत असल्याचं दिसून येत आहे, दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा दबाव असतानाच आता भारतानं मोठी खेळी खेळल्याचं समोर आलं आहे. टॅरिफ दबावात आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. गेल्या वर्षभरात भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक झपाट्याने कमी केली आहे. हा अमेरिकेसाठी आणि अमेरिकन चलन असलेल्या डॉलरसाठी मोठा झटका मानला जात आहे, अमेरिकन ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता भारताने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधले आहेत.
भारताची गुंतवणूक 21 टक्क्यांनी कमी झाली
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार 31 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत भारतानं अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक तब्बल 21 टक्क्यांनी कमी केली आहे. ही गुंतवणूक 241.4 अब्ज डॉलरने कमी होऊन 190.7 अब्ज डॉलर एवढीच राहिली आहे. गेल्या चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. त्यापूर्वी मात्र ही गुंतवणूक वाढतच चालली होती, मात्र आता टॅरिफनंतर ही गुंतवणूक झपाट्यानं कमी होत आहे.
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते भारतानं घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, भारत ज्या पद्धतीने ही गुंतवणूक कमी करत आहे, आणि इतर गुंतवणुकीचे मार्ग शोधण्यात येत आहेत, यावरून हे दिसून येत आहे की, भारताचं डॉलरवर असलेलं अवलंबित्व कमी होत आहे.याची थेट झळ ही अमेरिकेला बसत असून, गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या किंमतीमध्ये घट पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारताने अमेरिकेला आणखी एक धक्का दिला आहे, तो म्हणजे काही देशांसोबत भारतानं आता रुपयांमध्ये व्यवहार सुरू केला आहे.
