Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, आता थेट युद्ध? जगभरात खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, त्यानंतर चीन आणि रशियानं आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, त्यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली, अमेरिकेकडून निकोलस मादुरो यांच्यावर ड्रग्स तस्करीचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर चीन आणि रशियानं आक्रमक भूमिका घेतली आहे, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेनं सोडून द्यावं, अशी मागणी चीनने केली आहे, तसेच हे आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचं उल्लंघन असल्याचं देखील चीनने म्हटलं आहे. दरम्यान व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे ग्रीनलँडच्या पाठीमागे लागले आहेत, त्यांना ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवायचं आहे, त्यासाठी ते साम, दाम, दंड सर्व प्रकारच्या नीतींचा वापर करत आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना यामध्ये काही केल्या यश मिळताना दिसत नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे, ग्रीनलँड ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. ट्रम्प यांच्या या नीतीविरोधात ग्रीनलँडच्या संसदेमध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्ष एकत्र आले आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक स्टेटमेंट दिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ग्रीनलँडचं भविष्य फक्त येथील लोकच ठरवतील. संसदेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी एकसुरात म्हटलं आहे की, आम्हाला अमेरिकेमध्येही जायचं नाहीये आणि डेन्मार्कमध्ये देखील जायचं नाही. आम्हाला अमेरिकन देखील बनायचं नाहीये, आणि डॅनीश देखील बनायचं नाही, आम्हाला फक्त आमचा ग्रीनलँड हवा आहे.
एवढंच नाही तर ग्रीनलँडमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून ग्रीनलँडला हलक्यात घेऊ नका असा इशारा देखील ट्रम्प यांना देण्यात आला आहे. ग्रीनलँडचं भविष्य काय असणार हे आम्ही ठरवणार आहोत, दुसरा कोणताही बाहेरचा देश येऊन आमचं भविष्य ठरवू शकत नाही, असंही यावेळी ग्रीनलँडनं म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडलमधील लोकांना पैशांची देखील ऑफर केली होती, मात्र ट्रम्प यांची ही देखील ऑफर तेथील नागरिकांनी नाकारली आहे, त्यामुळे आता ज्या पद्धतीने अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला, तसाच हल्ला आता ट्रम्प ग्रीनलँडवर करणार का हे पहावं लागणार आहे.
