AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर वाढत आहे कर्जाचे ओझे, 2022 च्या अखेर पर्यंत कशी असेल भारताची स्थिती?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतावर कर्जाचे ओझे वाढत चालले आहे. जाणून घेऊया आकडेवारी

भारतावर वाढत आहे कर्जाचे ओझे, 2022 च्या अखेर पर्यंत कशी असेल भारताची स्थिती?
भारतावरचे कर्ज Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 13, 2022 | 3:51 PM
Share

नवी दिल्ली,  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार (IMF), 2022 च्या अखेरीस भारताचे GDP मधील कर्जाचे प्रमाण 84 टक्के असण्याचा अंदाज आहे, जो सध्या 69.62 टक्के आहे. त्यामुळे भारतही कर्जाच्या (Debts on India) जाळ्यात अडकत चालल्याचे चित्र आहे. आयएमएफचे म्हणणे आहे की भारताचे कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण जगातील सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपेक्षा खूप जास्त आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

वित्तीय तुटीबाबत स्पष्ट धोरण आवश्यक

आयएमएफच्या आर्थिक व्यवहार विभागाचे उपसंचालक पाओलो मौरो म्हणाले की, भारतासाठी मध्यम मुदतीत वित्तीय तुटीबाबत स्पष्ट धोरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय गोष्टी नियंत्रणात असण्याबाबत भारताने लोकांना आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त करणे आवश्यक आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होणार नाही.

कर्जाचा बोजा, पण भारताची कामगिरी आहे चांगली

IMF एशिया पॅसिफिकचे संचालक कृष्णा श्रीनिवासन म्हणाले की, सर्व देशांची आर्थिक वाढ घसरत आहे पण भारताची प्रगती चांगली होत आहे. ते म्हणाले की 2022 च्या अखेरीस कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या 84 टक्के असू शकते. जगातील अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. अनेक देशांच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असताना भारतावर त्याचा परिणाम होत नसून इतरांपेक्षा चांगली कामगिरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या देशांवर कर्जाचा बोजा

जपानचे कर्ज प्रमाण जीडीपीच्या 237 टक्के, इटलीचे 135 टक्के, सिंगापूरचे 126 टक्के, अमेरिकेचे 107 टक्के, फ्रान्सचे 98.10 टक्के, यूकेचे 80.70 टक्के तर भारताचे 69.62 टक्के आहे. पाकिस्तानमध्ये 84.80 टक्के आहे.

कर्जाच्या ओझ्याला जावे लागेल सामोरे

आयएमएफच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी जीडीपीच्या 15 टक्के कर्ज घ्यावे लागते. म्हणून, कर्ज घेण्याच्या गतीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच सध्या जीडीपीच्या 10 टक्के असलेल्या वित्तीय तूटची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. परंतु भारतासाठी चांगली परिस्थिती अशी आहे की तुलनेने येथील आर्थिक विकासाचा वेग अधिक चांगला राहिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...