Asmi Pistol: देशातील पहिली स्वदेशी बनावटीची पिस्तुल पाहिलीत का?

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे या पिस्तुलची निर्मिती केली. मेटल थ्रीडी प्रिटिंगच्या साहाय्याने ही पिस्तुल तयार करण्यात आली आहे. | Asmi Pistol

Asmi Pistol: देशातील पहिली स्वदेशी बनावटीची पिस्तुल पाहिलीत का?
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 11:20 AM

नागपूर: भारतीय लष्करासाठी देशात पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचे पिस्तुल तयार करण्यात आले आहे. या पिस्तुलचे नामकरण अस्मी असे करण्यात आले आहे. नागपूरच्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद बनसोड यांच्या संकल्पनेतून ही पिस्तुल साकारण्यात आली आहे. (Indias first indegenous machine pistol Asmi made in record time by Lt. Col. Prasad Bansod)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे या पिस्तुलची निर्मिती केली. मेटल थ्रीडी प्रिटिंगच्या साहाय्याने ही पिस्तुल तयार करण्यात आली आहे.

चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत 9 एमएमची ही पिस्तुल तयार करण्यात आली. या पिस्तुलचे वजन दोन किलो इतके आहे. ही पिस्तुल लवकरच लष्कर आणि निमलष्करी दलाच्या सेवेत दाखल होईल.

काय आहेत या पिस्तुलची वैशिष्ट्ये?

आठ इंची बॅरल (नळकांडे) असलेल्या या पिस्तुलमध्ये 33 गोळ्यांचे मॅगझिन आहे. या पिस्तुलमध्ये उच्च दर्जाचे अ‍ॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. या पिस्तूलमधून एखाद्या मशीनगनप्रमाणे स्वयंचलित पद्धतीने गोळ्या झाडता येतील. सशस्त्र दलातील सैनिकांसाठी वैयक्तिक शस्त्र म्हणून ही पिस्तुल वापरली जाऊ शकते. तसेच केंद्र व राज्य पोलीस संघटनेतील व्हीआयपी संरक्षण आणि गस्तीवरील जवानांना ही पिस्तुल दिली जाऊ शकते. या पिस्तुलची किंमत अवघी 50 हजार रुपये इतकी आहे.

भारतीय वायूदलाचे सामर्थ्य वाढले, चीनला भरणार धडकी; एकाचवेळी 10 ‘आकाश’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

काही दिवसांपूर्वीच भारताकडून आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. या प्रणालीच्या साहाय्याने एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेता येऊ शकतो. भारतीय संरक्षण व संशोधन संस्थेने (DRDO) विकसित केलेल्याआकाश क्षेपणास्त्रांमध्ये अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश क्षेपणास्त्र हे 30 किलोमीटरच्या परिघात आणि 19 किलोमीटर उंचीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग जवळपास 4000 किमी प्रतितास इतका आहे. तर आकाश क्षेपणास्त्राची लांबी 5.8 मीटर व वजन 720 किलो आहे. एकावेळी या क्षेपणास्त्रातून तब्बल 60 किलो स्फोटके वाहून नेता येऊ शकतात. तसेच हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीच्या राजेंद्र रडार प्रणालीने सुसज्ज आहे.

संबंधित बातम्या:

चीनला धडकी, भारताला लवकरच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार, रशियाचं आश्वासन

PHOTO: भारताचे ‘नाग’ क्षेपणास्त्र आता शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज

भारताकडून लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात, चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी शस्त्रसज्जता

(Indias first indegenous machine pistol Asmi made in record time by Lt. Col. Prasad Bansod)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.