भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडाला झापले, थेट इशारा देत म्हणाले अजिबात सहन करणार नाही

एस जयशंकर यांनी कॅनडा सरकारला चांगलेच झापले आहे. अतिरेक्यांना तुम्ही देशात प्रवेश देताच कसे. संशयित लोकं देशात राहतातच कसे. त्यांची कागदपत्रे तपासली जात नाहीत का म्हणत त्यांनी कॅनडाला फैलावर घेतले आहे. भारत याला सहन करेल असं समजू नका असं देखील परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडाला झापले, थेट इशारा देत म्हणाले अजिबात सहन करणार नाही
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 5:38 PM

गेल्या काही वर्षात जगभरात भारताचे वर्चस्व खूपच वाढले आहे. भारतासोबत मैत्री करण्यासाठी पाश्चात्य देशच नाही तर आखाती देश देखील आज उत्सूक आहेत. फ्रान्स, रशिया, ब्रिटन सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहत आहेत. त्यामुळेच भारत देखील आपली ताकद जगाला दाखवत आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खलिस्तानबाबत कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, ‘खलिस्तानी फुटीरतावादी घटकांना राजकीय स्थान देऊन कॅनडाचे सरकार कायद्याच्या राज्यापेक्षा त्यांची व्होट बँक अधिक शक्तिशाली असल्याचा संदेश देत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भाषण स्वातंत्र्याचा अर्थ अलिप्ततावादाचे समर्थन करण्याचे स्वातंत्र्य नाही. चांगल्या संबंधांसाठी याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.’

कॅनडाला थेट सवाल

संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कॅनडामध्ये राहण्याची परवानगी कशी दिली जाते याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ते देशात कसे आले, त्यांच्याकडे कोणता पासपोर्ट आहे. अत्यंत संशयास्पद कागदपत्रांवर ते आले असतील तर तुमचे यावर उत्तर काय आहे. तुमची व्होट बँक तुमच्या कायद्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे का. असा सवाल एस जयशंकर यांनी केला आहे.

कॅनडामध्ये भारतीय प्रवाशांची संख्या सुमारे १८ लाख आणि अनिवासी भारतीयांची संख्या १० लाख आहे.भारतीय स्थलांतरित हे बहुतेक शीख आहेत. कॅनडाच्या राजकारणात ते एक प्रभावशाली गट मानले जातात. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. भारताने ट्रुडो यांचे हे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते.

अतिरेक्यांना समर्थन देत आहात का?

कॅनडाच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तान समर्थक घटक यांना कॅनडा अभय देत आहे. एस जयशंकर म्हणाले की, आज कॅनडाच्या राजकारणात प्रमुख पदांवर असे लोक आहेत जे प्रत्यक्षात अशा प्रकारच्या फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना समर्थन देत आहेत.”

कॅनडातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताची योजना काय आहे यावर बोलताना ते म्हणाले की, चांगले संबंध असले तरी आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताच्या चिंता व्यक्त करतो तेव्हा कॅनडाने म्हणतो की, त्यांना भाषण स्वातंत्र्य आहे. पण काही नवीन मुद्दा नाही. सुमारे 10 वर्षांपासून हे सुरू आहे. आपल्या देशातही भाषण स्वातंत्र्य आहे. परंतु भाषण स्वातंत्र्य म्हणजे परदेशी मुत्सद्दींना धमकावण्याचे स्वातंत्र्य नाही, भाषण स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की लोक कॅनडामध्ये घेत असलेल्या पोझिशन्स आणि क्रियाकलापांमुळे आमचे नुकसान होईल.”

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.