चीनचा पुन्हा पाकिस्तानला धोका, एका रेडिओमुळे कसा झाला पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा? Inside Story
ज्या दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्यामध्ये हाशिम मूसा उर्फ सुलेमान याचा देखील समावेश आहे. हाशिम मूसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.

काश्मीरच्या खोऱ्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे, श्रीनगरच्या महादेव पर्वतावर सीआरपीएफ आणि जम्मू -काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अजूनही एक दहशतवादी या ठिकाणी लपून बसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे, तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतरही या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरूच असून, चौथ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.
ज्या दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्यामध्ये हाशिम मूसा उर्फ सुलेमान याचा देखील समावेश आहे. हाशिम मूसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला झाला होता. मूसा हा काही काळ पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सचा जवान देखील होता. ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, त्यांच्याजवळ हायटेक शस्त्र देखील आढळून आले आहेत.
असा झाला मूसाचा खात्मा
सुरक्षा दलाच्या हवाल्यानुसार पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची दहशतवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर होती. याच दरम्यान भारतीय सुरक्षा दलाला चायनीज अल्ट्रा रेडिओ कम्युनिकेशन सक्रिय झाल्याचा खात्रीलायक पुरावा मिळाला. लष्कर ए तैयबाचे दहशतवादी एनक्रिप्टेड मेसेजसाठी चायनीज अल्ट्रा रेडिओचा वापर करतात.
भारतीय सुरक्षा दलाला जसा चायनीज अल्ट्रा रेडिओ कम्युनिकेशन सक्रिय झाल्याचा मेसेज मिळाला, तसे सीआरपीएफचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले. ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाशिम मूसा उर्फ सुलेमान याचा देखील समावेश आहे. दरम्यान या ठिकाणी आणखी एक दहशतवादी लपला असल्याचा संशय असल्यानं अजूनही या ठिकाणी ऑपरेशन महादेव सुरूच आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशदवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले होते, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आज ऑपरेशन सिंदूरवर सभागृहात जोरदार चर्चा झाली.
