AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Yoga Day 2026 : ज्या ठिकाणी होती फक्त नमाजासाठी परवानगी, तेथे मोदींच्या नेतृत्वाखाली घडला मोठा आणि नवा इतिहास

International Yoga Day 2026 : भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनातील योगाचं महत्त्व पटवून देत, कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर मोठा इतिहास रचला आहे.. ज्या ठिकाणी फक्त नमाजासाठी परवानगी होती, तेथे 35 हजार लोकांनी मोदींच्या नेतृत्वाखाली मोठा आणि नवा इतिहास रचला आहे.

International Yoga Day 2026 : ज्या ठिकाणी होती फक्त नमाजासाठी परवानगी, तेथे मोदींच्या नेतृत्वाखाली घडला मोठा आणि नवा इतिहास
Prime Minister Modi
| Updated on: Jun 21, 2026 | 9:14 AM
Share

International Yoga Day 2026 : भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जीवनात योगाचं असलेलं महत्त्व पटवून सांगत असतात. यंदाच्या वर्षी येग दिन साजरा करण्यासाठी मोदी पश्चिम बंगाल, कोलकाता येथे आहे. आजच्या दिवशी आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर नवा इतिहास घडला आहे. यावेळी जनतेला संबोधित करत मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगाल, कोलकातामध्ये स्वच्छतेसाठी जे योगदान दिलं जात आहे, त्यासाठी मी कोलकातावासीयांचे कौतुक करेन… स्वच्छतेतून स्वागत… योग दिनाच्या निमित्ताने आज बंगालमध्ये असणं हे खूपच विशेष आहे.

‘ही ती भूमी आहे जिथे भगवान रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या सिद्ध संतांनी अवतार घेतला. येथूनच स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली. लाहिरी महाशय यांच्यासारख्या महान योग्यांनी जिथे योग परंपरेला नव्या उंचीवर नेलं, अशा या पवित्र भूमीवर आज सामूहिक योगाचा अनुभव एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देत आहे.’

‘इथे आजूबाजूला अनेक लोक एकत्र आले आहेत, हेच एकत्र येणे म्हणजे योगाचा खरा भाव आहे. योग हा मानवी जीवनासाठी चेतनेबरोबरच ऊर्जेचा आणि प्रकाशाचाही स्रोत आहे. वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो. संतुलित आहार-विहाराने, संतुलित क्रिया आणि कर्मांनी, संतुलित झोप आणि जागरणाने योग दुःखांचा नाश करणारा ठरतो. संतुलित योग हाच जीवनाचा आधार आहे.’

पुढे मोदी म्हणाले, ‘परंतु आजच्या आधुनिक काळात बहुतेक लोक असंतुलनात जगत आहेत. योग केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर योग मानसिक आरोग्यातून शारीरिक आरोग्याचा मार्ग दाखवतो. योग आपल्या जीवनात शांतीचा स्रोत बनतोच, त्याचबरोबर त्यातून विश्वशांतीचा मार्गही खुला होतो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोक योगाशी जोडले जातात. यावर्षी ‘योग 365’ या उपक्रमालाही पुढे नेण्यात आले. 130 देशांतील 30 लाखांहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे.” असं देखील मोदी म्हणाली

पंतप्रधान मोदींसोबत 35 हजार कोलकाताकरांचा रेड रोडवर नवा इतिहास

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर आज नवा इतिहास घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधानांसोबत 35 हजारांहून अधिक लोकांनी एकत्र योगाभ्यास केला. रेड रोडवर सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत योग करण्याची संधी मिळाल्याने कोलकातावासीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनेक वर्षांनंतर रेड रोडवर इतक्या मोठ्या प्रमाणात योगाचा कार्यक्रम झाला.

स्थानिक लोकांनी सांगितले की, यापूर्वी कोलकात्यात कधीही एवढ्या भव्य प्रमाणात योगाचा कार्यक्रम झाला नव्हता. पंतप्रधानांसोबत योग करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ज्या रेड रोडवर आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा कार्यक्रम पार पडला, त्या रेड रोडचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. पश्चिम बंगालमधील नागरिकांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत या रेड रोडवर फक्त नमाजसाठी परवानगी दिली जात होती. कोणत्याही हिंदू सणासाठी किंवा योगासाठी येथे परवानगी दिली जात नव्हती. पंतप्रधानांसोबत योग करून खूप छान वाटल्याचं नागरिकांनी सांगितलं.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी