AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्ही आमच्या देशात सैन्य उतरवलं तर…; इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, युद्ध आणखी पेटणार?

मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला हादरवणारी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेकडून इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याची तयारी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला धमकी दिली आहे.

जर तुम्ही आमच्या देशात सैन्य उतरवलं तर...; इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, युद्ध आणखी पेटणार?
Motzava KhameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 5:14 PM
Share

अमेरिका -इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हे युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हवाई हल्ले करण्यात आले. मात्र तरी देखील इराण या युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता अमेरिकेकडून प्लॅन बी सक्रिय करण्याचा विचार सुरू आहे. अमेरिकेकडून आता इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून अमेरिकेनं आपले हजारो सैनिक मध्य पूर्वेत पाठवले आहेत. असा अंदाज वर्तवला जात आहे की, अमेरिका इराणसाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं खर्ग बेट ताब्यात घेऊ शकते. जर अमेरिकेन इराणचं खर्ग बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

अमेरिकेकडून इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरू असतानाच आता इराणकडून अमेरिकेला हादरवणारी धमकी देण्यात आली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकीर कालिबफ यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. आम्ही तुमचं सैन्य इराणमध्ये कधी प्रवेश करतं याची वाटच पहात आहोत. आमचं इराणी सैन्य तुमच्या सैन्याला जाळून टाकेल, त्यांची आम्ही राख करू असं मोहम्मद बाकिर कालिबफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे एक रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टने अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. इराणकडून मोठा दावा करण्यात आला आहे. हे युद्ध दोन वर्ष जरी सुरू राहिलं तरी आम्हाला फार काही फरक पडणार नाही. युद्ध सुरू होऊन एक महिना झाला आहे, मात्र आम्ही आतापर्यंत आमच्या पूर्ण क्षमतेच्या फक्त 30 टक्के इतक्याच मिसाईलाचा वापर केला आहे. अजूनही आमच्याकडे मिसाईलचा 70 टक्के साठा शिल्लक असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे युद्ध लांबण्याची चिन्हं आहेत. दरम्यान युद्ध सुरू होऊन फक्त एक महिनाच झाला आहे, तर जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. जर हे युद्ध लांबलं तर जगावर फार मोठं संकट येण्याची शक्यता आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात