Politics: देशातील राजकारणाचा मूड बदलतोय? आपचा चढता ग्राफ, भाजपा स्थिर, काँग्रेस पिछाडीवर, काय सांगतो नवा सर्व्हे?

या सर्वेनुसार, भाजपाचा शहरी भागातील मतदार स्थिर आहे दुसरीकडे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकाची पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात दिसते आहे. काँग्रेसबाबत बोलायचे झाले तर त्यांचा जनाधार कमी होताना दिसतो आहे.

Politics: देशातील राजकारणाचा मूड बदलतोय? आपचा चढता ग्राफ, भाजपा स्थिर, काँग्रेस पिछाडीवर, काय सांगतो नवा सर्व्हे?
मूड बदलतोय?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:37 PM

नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून बंडखोरीमुळे अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी (Congress)आणखी एक वाईट बातमी आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस पक्ष त्याच्या इतिहासातील वाईट काळातून जात आहे. पक्षाचा जनाधार आक्रसताना दिसतो आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी (AAP)हा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर गतीने विस्तारताना दिसतो आहे. भाजपाचा (BJP) विचार केला तर त्यांच्या पाठिराख्यांची संख्या स्थिर असल्याचे दिसते आहे. हे सर्व समोर आले आहे ते मिंट-सीपीआर मिलेनियम सर्वेमध्ये. या सर्वेक्षणातून शहरातील मतदारांच्या मनात काय आहे, हे जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्वेमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची आणि आपचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

काय आहेत सर्वेतील निरीक्षणे?

या सर्वेनुसार, भाजपाचा शहरी भागातील मतदार स्थिर आहे दुसरीकडे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधकाची पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात दिसते आहे. काँग्रेसबाबत बोलायचे झाले तर त्यांचा जनाधार कमी होताना दिसतो आहे. सर्वेतील 36 टक्के सहभागी जनतेने भाजपा ही पहिली निवड असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबर डिसेंबर 2021  साली गेल्या गेलेलया सर्वेमध्ये भाजपाला 38 टक्के जणांचा पाठिंबा होता. शहरांत, तरुणांत आणि पुरुषांमध्ये भाजपाचा पाठिंबा कमी झालेला दिसतो आहे. काँग्रेसला यंदा 9 टक्के जणांची पसंती आहे, गेल्या वर्षी हा आकडा 11 टक्के होता. आपचा ग्राफ वाढता दिसतो आहे. गेल्यावर्षी त्यांना 1 टक्के जनतेचा पाठिंबा होता, तो यंदा वाढून 7 टक्क्यांवर पोहचला आहे. सर्वेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा वाढताना दिसतो आहे. गेल्यावर्षी 16 टक्के जनतेने प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दर्शवला होता, तो आकडा आता वाढून 20 टक्के झाला आहे.

कसा करण्यात आला सर्व्हे?

ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म YouGov, मिंट आणि दिल्लीतील थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च यांनी एकत्रित हे सर्वेक्षण केले. दर सहा महिन्यांनी करण्यात येत असलेल्या या सर्वेक्षणाची ही आठवी वेळ आहे. सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. या सर्व्हेत देशातील 204 शहरांतील 10271  जणांनी सहभाग नोंदवला. या सर्व्हेतून भारतीयांच्या अपेक्षा, चिंता आणि राजकीय कल जोखण्यात आला.

हे सुद्धा वाचा

आप ठरतोय राजकीय पर्याय?

सर्वेतील 28 टक्के जणांनी कोणताही पक्ष हा पहिली पसंद नसल्याचे सांगितले. गेल्या वेळी हा आकडा 34 टक्के होता. या उदासीन असणाऱ्या मतदारांना आपने आकर्षित केल्याचे दिसते आहे. आपच्या पंजाबच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या या मतदारांचे लक्ष आता गुजरात, हिमाचलच्या निवडणुकांकडे असणार आहे. आपची लोकप्रियता उ. भारतात 13 टक्के तर पश्चिम भारतात 7 टक्के आहे. दक्षिणेत पक्षाला मेहनत घ्यावी लागणार आहे. भजापाच्या विरोधात कुणाला पसंती द्याल, त्यात 31 टक्के जणांनी आपसारख्या नव्या पर्यायाचे नाव घेतले. तर 19 टक्के जनतेलाच असे वाटते आहे की, भाजपाला काऊंटर करण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे. तर 21 टक्के जणांना वाटते आहे की प्रादेशिक पक्ष भाजपाला रोखू शकतील.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.