AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाममध्ये ईसिसचा पॅटर्न ? 26/11 सारखाच हल्ला,आधी नाव विचारले मग मारले…

Kashmir Terrorist Attack : पर्यटकांसाठी नंदनवन ओळखला जाणाऱ्या कश्मीरात ऐन पर्यटन हंगामात रक्ताचे सडे पडले आहेत. हा हल्ला मुंबईवरील 26/11 हल्ल्याची आठवण करुन देणारा असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

पहलगाममध्ये ईसिसचा पॅटर्न ? 26/11 सारखाच हल्ला,आधी नाव विचारले मग मारले...
ISIS PATTERN BEHIND PAHALGAM ATTACK
| Updated on: Apr 22, 2025 | 8:53 PM
Share

जम्मू-कश्मीरातील पहगाम येथे मंगळवारी झालेला दहशतवादी हल्ला हा मुंबईवरील 26/11 हल्ल्याची आठवण करुन देणारा असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांनी आधी पर्यटकांना त्याचे नाव,धर्म विचारलानंतर त्यांच्यावर गोळ्यांची बरसात केली आहे. हा हल्ला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयएस सारख्या पॅटर्न सारखा दिसत आहे. या हल्ल्यामागे कोणती संघटना आहे याची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. अतिरेकी लागलीच कसे काय गायब झाले याबद्दलही संशय घेतला जात आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातही अतिरेक्यांनी अशाच प्रकार केला होता. या अतिरेकी हल्ल्यात नाव,धर्म आणि जात विचारुन ताबडतोब फायरिंग करण्यात आली होती. पोलीस अधिकारी, परदेशी पर्यटक, आणि ज्यू लोकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा पॅटर्न अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेट ( ISIS ) सारखा म्हटला जात आहे. हा पॅटर्न आता लश्कर आणि जैश-ए-मोहम्‍मद या दहशदवादी संघटनांनी देखील अनुसरला आहे. इसिस प्रमाणे या हल्ला करण्यात आला असून अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला आहे.

या आधीचे ISIS सदृश्य हल्ले

16 ऑगस्त 2022, शोपिया

या हल्ल्यात अतिरेक्यांनी सफरचंदच्या बागेत काम करणाऱ्या सुनील भट्ट यांना आधी त्यांचे नाव विचारले आणि गोळ्या घातल्या. तेव्हा असे म्हटले जात होते की हा कश्मीरी पर्यटकांना टार्गेट करण्यासाठी केलेला हल्ला आहे. त्यावेळी कश्मीरी पंडीताचा देखील कत्लेआम केला होता.

31 मे 2022, कुलगाम

अतिरेक्यांनी शालेय शिक्षक रजनी बाला यांची हत्याकेली होती. हल्लेखोरांनी आधी त्यांचे नाव आणि इतर माहीती विचारली नंतर गोळी मारली. या घटनेतही कश्मीर पंडीतांना टार्गेट केले होते.

26/11 मुंबईवरील हल्ला

26/11 मुंबईवरील हल्ल्या लष्कर ए तैयब्बाच्या अतिरेक्यांनी नरिमन हाऊसला टार्गेट केले होते. येथील ज्यू समुदायाच्या लोकांना ओलीस ठेवून त्यांची हत्या केली होती. रब्बी गॅर्व्हीएल होल्ट्जबर्ग आणि त्यांची प्रेग्‍नेंट पत्नी रिवकाह यांची हत्या केली होती. डेव्हीड हेडली याच्या चौकशीत या ही बाब उघड झाली होती. अतिरेक्यांनी धार्मिक ओळख विचारुनच हल्ले केले होते. मात्र, सीएसएमटी आणि ताज,ओबेरॉय अशा इतर ठिकाणी मात्र अंधाधुंद फायरिंग केली होती त्यात सर्वच धर्माचे लोक ठार झाले होते.

आयएसआयएस ( ISIS )  पॅटर्न कश्मीरी अतिरेक्यांनी आत्मसात केला?

आयएसआयएसच्या अतिरेक्यांनी 14 डिसेंबर 1993 रोजी अल्जीरियामध्ये क्रोएश‍ियाच्या 12 पर्यटकांची हत्‍या केली होती.तेथे त्यांना धर्म विचारुन ठार केले होते. साल २०१५ मध्ये देखीलपॅरीसवर झालेला हल्ला आणि साल २०१९ मध्ये श्रीलंका ईस्टर बॉम्बस्फोट प्रकरणात ही हे उघडकीस आले होत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.