AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरनंतर चीनसमोर नवीन टेन्शन, इस्त्रोकडून लॉन्च होणार खास सॅटेलाईट

ISRO satellite: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीने भारतीय सैन्याने लष्करी रडार प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले.

ऑपरेशन सिंदूरनंतर चीनसमोर नवीन टेन्शन, इस्त्रोकडून लॉन्च होणार खास सॅटेलाईट
ISRO
| Updated on: May 11, 2025 | 3:14 PM
Share

ISRO satellite: भारत ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत चीनचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. अवकाशातून भारताची देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग सॅटेलाइटला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.59 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे.

सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्याचे काम होणार

भारताचा देखरेख ठेवणारा उपग्रह अधिक चांगली माहिती देणार आहे. EOS-09 अत्याधुनिक सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज आहे. यामुळे विपरीत हवामानाची पर्वा न करता पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन फोटो कॅप्चर करणे शक्य होणार आहे. हा उपग्रह भारताच्या पाकिस्तान आणि चीनसोबतच्या संवेदनशील सीमांवर देखरेख वाढवणार आहे. तसेच सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

RISAT-1B चे सी-बँड सिंथेटिक एपर्चर रडार या अडथळ्यांवर मात करू शकते. घुसखोरी शोधण्यासाठी, संशयास्पद शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दहशतवादविरोधी अभियानासाठी त्याची भूमिका महत्वाची आहे. सीमेवर तणाव वाढत असताना सतत आणि विश्वासार्ह गुप्त माहिती प्रदान करण्याची उपग्रहाची क्षमता भारतीय सुरक्षा दलांसाठी महत्वाची आहे.

कसे काम करणार RISAT-1B

RISAT-1B या मध्ये पाच वेगवेगळे इमेजिंग मोड आहे. लहान वस्तूंचा शोध घेण्यासाठी अल्ट्रा-हाय- रिजॉल्यूशन इमेजिंगचा वापर करणार आहे. तसेच मोठा भाग दाखवण्यासाठी स्कॅनच्या दरम्यान स्विच करण्याची सुविधा आहे. सैन्य आणि नागरी दोन्ही ठिकाणी त्याचा वापर करता येणार आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीने भारतीय सैन्याने लष्करी रडार प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले. भारताने या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त केली. त्यासाठी उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीचा मोठा उपयोग झाला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...