राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. . 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले.

राम मंदिर निकालाच्या निर्णयावर कसे झाले एकमत, सरन्यायाधीशांनी सांगितले काय घडले
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 10:01 AM

नवी दिल्ली, दि. 2 जानेवारी 2024 | अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्याचा निकाल सर्व न्यायमूर्तींनी एकमताने दिला. परंतु हा निकाल कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत मिळाले नाही. तसेच या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळणारही नाही. 134 जुन्या या खटल्याचा निकाल लिहिणाऱ्याचे रहस्य हे उलगडले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी या खटल्याचा निकाल दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, हे ही या निकालात म्हटले गेले आहे. या निकालानंतर अयोध्या राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

निकाल देणारे कोण होते न्यायमूर्ती

अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि सध्याचे सरन्याधीश धनंजय यशवंत चंद्रचूड होते. 134 जुन्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने दीर्घ इतिहास, विविध दृष्टीकोन लक्षात घेतला. सर्वांनी एकमताने एका स्वराने निर्णय घेण्याचे ठरवले. निकालाच्या प्रतीवर कोणाचे नाव नसणार आहे, हे ही एकमताने ठरवण्यात आले. यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही. यावेळी न्या. चंद्रचूड यांना कलम 370 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला.

हे सुद्धा वाचा

काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या खटल्याचा निकाल दिला होता. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला होता. बाबरी मशीद अवैध होती, असे सांगत ही जागा राम मंदिर ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेतला. तसेच मशीदीसाठी पाच एकर जागा दुसरीकडे देण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाच ऑगस्ट 2020 राम मंदिराचा भूमी पूजन कार्यक्रम झाला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक साधू-संत सहभागी झाले होते.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.