Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!

जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत.

Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!
Follow us
| Updated on: Aug 05, 2019 | 1:10 PM

Article 370 मुंबई/ नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कलम 370 हटवण्यास दिलेल्या मंजुरीची प्रत गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केली. अमित शाह यांनी सभागृहात संकल्पपत्र वाचून दाखवलं. त्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही. राष्ट्रपतींच्या आदेशाने टाकलेलं कलम राष्ट्रपतींच्या आदेशानेच काढलं.

अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीरबाबात दोन संकल्प आणि दोन विधेयकं सादर केली. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. यादरम्यान अमित शाहांनी जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयक सादर केलं. यानुसार जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळं केलं. लडाख हे विधानसभा नसलेलं, तर जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल.

कलम 370 हटवणार

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकंच नाही तर राज्याच्या पुनर्रचनेचाही प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. यानुसार लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्याचा प्रस्ताव आहे. अमित शाह हे जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 35 A रद्द करतील असे तर्क होते, मात्र त्यापुढे जाऊन, ज्या कलमांतर्गत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे, ते कलम 370 हटवण्याचाच प्रस्ताव अमित शाहांनी ठेवला. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली.

जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घटना
 
1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात
2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती
3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू
4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात
5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार

संबंधित बातम्या 

Article 370 | जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने काय होईल?  

Article 35 A | जम्मू काश्मीरमधील कलम 35 A हटवल्यास काय होईल?  

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.