AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच, श्रीनगरच्या हरि सिंग रस्त्यावर ग्रेनेड हल्ला

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम काही तासांवर आला असतानाच जम्मू काश्मिरमध्य दहशतवाद्यांकडू ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्यांना थांबविण्याचे प्रयत्न भारतीय सैन्यांकडून चालू आहेत, मात्र मंगळवार श्रीनगमधील हरि सिंग हायस्ट्रीटवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्लयात कुणीही जखमी झाले नाही.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच, श्रीनगरच्या हरि सिंग रस्त्यावर ग्रेनेड हल्ला
Terror Attack jammu kashmir
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 5:26 PM
Share

दिल्लीः प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम काही तासांवर आला असतानाच जम्मू काश्मिरमध्य (Jammu-kashmir) दहशतवाद्यांकडू (Terror Attack) ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवायांना थांबविण्याचे प्रयत्न भारतीय सैन्यांकडून (Indian Army) चालू आहेत, मात्र मंगळवार श्रीनगमधील हरि सिंग हायस्ट्रीटवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसले तरी हल्ला झालेल्या परिसरातील दुकानांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी भारतीय सैन्य दलाकडून आणि स्तानीक पोलीस दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही दहशतवाद्यांकडून कुरघोड्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काही भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ले केले होते. या हल्लयात नागरिक व स्थानीक पोलीस दलातील कर्मचारीही जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या या कारवायांमुळे स्थानीक नागरिकाचे जनजीवन विस्कळीत होत आहे.

वारंवार सर्च ऑपरेशन

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकांकडून या परिसराला कडक सुरक्षा व्यवस्था देऊन दहशतवाद्याना शोधण्याचे काम सुरू केले आहे. वारंवार सर्च ऑपरेशन सुरू असूनही ग्रेनेड हल्ले, सामन्य लोकांवर गोळीबार अशा प्रकारांनाही आता ऊत आला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन, मतदान अशा दिवशी भारतीय सैन्य दलाकडून जम्मू काश्मीरमधील अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहेत.

दहशतवाद्यांच्या कारवायांना सडेतोड उत्तर

जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेले भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. तरीही दहशतवाद्यांकडून छोटे मोठे हल्ले करण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे जम्मू काश्मिरमधील वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे दहशतवाद्यांवर कडक कारवाईही करण्यात येत आहे. भारतीय सैन्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया कडक करण्यात आल्या असल्याने दहशतवाद्यांच्या कुरघोड्याही सुरूच आहेत.

या हल्ल्याबाबत भारतीय सैन्य दलाकडून सविस्तर माहिती अजूनही देण्यात आली नाही. मात्र ज्या ज्या ठिकाणी दहशतवादी कुरघोड्या होण्याची शक्यता आहे.त्या त्या ठिकाणी सैन्य दलाकडून सैन्य तुकड्या वाढविण्याचे काम सुरू आहे. तर जम्मू काश्मीरमधील काही भागात स्थानीक पोलिसांचा आधार घेऊन कारवायांचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे.

काश्मीरमधील पोलिसांवरही ग्रेनेड

जम्मू काश्मिरमधील काही परिसरात दहशतवाद्यांच्या कुरघोड्या वाढल्या आहेत. याच महिन्यातील 16 तारखेला जुन्या श्रीनगरमधील भारतीय सैनिकांवर ग्रेनेड हल्ला झाला होता. यामध्ये एक सैनिक आणि नागरिक जखमी झाला होता. तसेच केंद्रीय राखीव दलाच्या आणि काश्मीरमधील पोलिसांवरही ग्रेनेड हल्ला झाला होता.

दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशवाद्यांविरोधात अभियान चालू करण्यात आले आहे. या ठिकाणी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटांना संपविण्यासाठी भारतीय सैनिक आणि काही सुरक्षा दलाच्या संस्था काम करत आहेत.

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

Nashik | स्कूल बस जळून खाक; विद्यार्थ्यांसह 2 शिक्षिका सुखरूप, कशी घडली अनर्थकारी घटना?

मालेगावात काँग्रेसला मोठं खिंडार, 27 नगरसेवकांची सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.