CCTV : काश्मीरात 8 तासांत 2 बसमध्ये भीषण ब्लास्ट, अतिरेकी हल्ल्याचा कट?

8 तासांच्या आत दोन बसमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ! अतिरेकी हल्ल्याचा कट की आणखी काही? पोलीस यंंत्रणा अलर्ट मोडवर

CCTV : काश्मीरात 8 तासांत 2 बसमध्ये भीषण ब्लास्ट, अतिरेकी हल्ल्याचा कट?
स्फोटानंतर चिंधड्या उडालेली बस
Image Credit source: tv9 marathi
सिद्धेश सावंत

|

Sep 29, 2022 | 8:17 AM

जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) एक मोठी घडामोड समोर आलीय. बुधवारी रात्री जम्मू काश्मीरच्या उधमपूर (Udhampur Bus Blast News) इथं एका बसमध्ये ब्लास्ट झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पहाटे आणखी एक बस स्फोटाने हादरुन गेली. यात बसचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं बसमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. 8 तासांच्या आतच दोन बस स्फोटाने हादरल्यानं संशय व्यक्त केला जातोय. हा अतिरेकी हल्ल्याचा (Terrorist Attack) कट होता का? या अनुषंगाने तपास केला जातोय. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलीय.

दोन्ही ब्लास्ट झाले तेव्हा सुदैवाने बसमध्ये कुणीही प्रवसा नव्हते. त्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. या स्फोटाची तीव्रता जबरदस्त असल्याचंही समोर आलंय. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये बसमधील स्फोट कैद झालाय. त्यात अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.

सध्या या दोन्ही स्फोटप्रकरणी तपास केला जातोय. तूर्तासतरी जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही. मात्र दोघे जण जखमी झाले असल्याचं सांगितलं जातंय.

पाहा व्हिडीओ :

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील दोमेल इथं ही घटना घडली. पेट्रोल पंपवर उभ्या असलेल्या बसमध्ये ब्लास्ट झाला. यात बसच्या चिंधड्या उडाल्या.

दरम्यान, ब्लास्ट झालेल्या बस जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या एका मिनी बसमध्ये असलेले दोघे जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सुरक्षबलाच्या जवानांकडून घटनास्थळी तपास केला जातोय.

28 सप्टेंबरला रात्री 10.30 वाजता पहिला ब्लास्ट नोंदवला गेला. तर त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता दुसऱ्या एका बसमध्ये ब्लास्ट झालाय. अमित शाह यांचा 30 सप्टेंबरपासून जम्मू काश्मीर दौरा सुरु होणार होता. पण आता या दौऱ्यातही बदल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याआधी घडलेल्या या घटनेनं अनेक सवाल उपस्थित केलेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू काश्मीर दौरा 3 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलाय. आता 3 ऑक्टोबरपासून ते जम्मू काश्मीर दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान, वेगवेगळ्या कार्यक्रमांत ते सहभागी होणार आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें