जीवन उत्कर्ष महोत्सव: पाचव्या दिवशी महिलांच्या योगदानाचा गौरव, विविध मान्यवरांची उपस्थिती
Jeevan Utkarsh Festival: जबलपूरमध्ये बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने जीवन उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. या खास उत्सवाच्या पाचव्या दिवशी आध्यात्मिक विकास आणि महिलांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.

जबलपूर, 7 नोव्हेंबर 2025: जबलपूरमध्ये बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने जीवन उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. या खास उत्सवाच्या पाचव्या दिवशी आध्यात्मिक विकास आणि महिलांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. नागपूर युवती मंडळाच्या महिलांनी सादर केलेल्या मंगलमय सूर, प्रार्थना आणि भगवानांच्या मधुर कीर्तनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती रूपा बहन राव यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती आणि मान्यवरांनी या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
पाचव्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, संगीत आणि प्रेरणादायी प्रवचनांद्वारे परमपूज्य महंत स्वामी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू अत्यंत भावनिक आणि सखोल पद्धतीने सादर करण्यात आले. “तस्मय श्री गुरुवे नमः” या संकल्पनेवर आधारित एका अनोख्या नृत्यनाट्याने परमपूज्य महंत स्वामी महाराजांचा साधेपणा, अहंकारहीनता, करुणा, समता आणि भक्ती या दैवी गुणांवर प्रकाश टाकला. यातून महंत स्वामी महाराज हे केवळ संत नसून जीवन परिवर्तनाचे मूर्त स्वरूप आहेत अशी प्रचिती आली.
या खास कार्यक्रमाला रायपूर महिला मंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. नमिता यांनी सामाजिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक क्षेत्रात बीएपीएस महिलांच्या वाढत्या योगदानावर प्रेरणादायी प्रवचन दिले. या प्रवचनामुळे परिसतात नवीन ऊर्जा संचारली. कार्यक्रमाचा शेवट सर्व मान्यवरांसाठी विशेष सन्मान आणि परमपूज्य महंत स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी व्हिडिओच्या सादरीकरणाने झाला.
पाचव्या दिवशी महिला आणि त्यांच्या योगदानाबद्दलच्या असलेल्या कार्यक्रमांमधून महंत स्वामींचे आदर्श जीवन सादर केले गेले. हे सर्व श्रोत्यासाठी प्रेरणादायी होते. या महोत्सवाच्या माध्यमातून, BAPS संघटनेचे उद्दिष्ट समाजात मूल्ये आणि संस्कृती रुजवणे आहे, हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आले.
BAPS श्री स्वामीनारायण मंदिर, जबलपूर (मध्यप्रदेश)
