व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका

अखिल भारतीय संत समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray).

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 8:21 AM

नवी दिल्ली : हिंदू साधू आणि संतांच्या सर्वोच्च संस्थांपैकी एक अखिल भारतीय संत समितीने राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray). उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता राम मंदिर भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याची सूचना केली होती. यावर अखिल भारतीय संत समितीचे महासचिव जितेंद्रानंद सरस्वती यांनी जहरी टीका केली. उद्धव ठाकरे मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा असल्याची जहरी टीका त्यांनी केली. त्यामुळे आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.

जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, “उद्धव ठाकरे एका मोठ्या नेत्याचा नालायक मुलगा आहे. ते त्या मोठ्या नेत्याच्या वारशावर ताबा मिळवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका कॉनव्हेंट शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना वास्तवात आणि व्हर्च्युअल यातला फरक कळत नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्याने असंच होणार”

जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले, “बापाच्या वारशांवर नालायक मुलगा बसला आहे. त्याला धर्म, अध्यात्माची भाषा राजकारणाची भाषा वाटते आहे हे दुखद आहे. इटालियन बटालियनच्या कुशीत बसल्यावर हेच होणार आहे. तुम्ही यापेक्षा अधिक काही अपेक्षितही करु शकता?”

सरस्वती यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राम मंदिराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे वडील एक मोठी व्यक्ती होते. मात्र, उद्धव ठाकरे एका मिशनरी शाळेत शिकत होते आणि आता त्यांना आभासी आणि वास्तवामधील फरक लक्षात येत नाही. पृथ्वीला स्पर्श केल्याशिवाय भूमिपूजन कसं करु शकतो?”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

भूमिपूजनासाठी आमंत्रित धर्मगुरुंनी सांगितलं, की या कार्यक्रमात सहभागी होणारे उद्योगपती अयोध्याचं पुनर्निमाण करण्यासाठी मदत करणार आहेत. आजची अयोध्या भविष्यात भारताची अध्यात्मिक राजधानी असेल. अनेक उद्योगपती येथे येणार आहेत. ते अयोध्येची पुनर्निमिती करण्यात मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

“आता काशी आणि मथुरेतील मंदिरांची प्रतिक्षा”

जितेंद्रानंद सरस्वती आता काशी आणि मथुरामध्ये देखील भविष्यात मंदिरं निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत. ते म्हणाले, “आपण राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमीचे देखील साक्षीदार असू अशी अपेक्षा आहे. काशी आणि मथुरा आमच्यासाठी वेगळे नाहीत. आम्हाला केवळ आमची 3 मंदिरं परत हवी आहेत. ”

हेही वाचा :

शिवसेनेकडून एक रुपयाही नाही, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा दावा; अनिल देसाईंकडून स्पष्टीकरण

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी

Ayodhya Ram Mandir | रामाच्या जन्मापासून ते लंका दहनापर्यंतचे सर्व प्रसंग भिंतीवर, भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज

Jitendranand Saraswati criticize Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.