जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी, आणखी 4 लसी प्रतीक्षेत, कधी पूर्ण होणार देशातलं लसीकरण?

भारतात मागच्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र आहे. यासोबत देशभर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जॉनसन अँड जॉनसनची लस वापरात आल्याने लसीकरणाला वेग मिळणार आहे.

जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी, आणखी 4 लसी प्रतीक्षेत, कधी पूर्ण होणार देशातलं लसीकरण?
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 12:21 PM

नवी दिल्ली : जॉनसन अँड जॉनसनच्या (Johnson & Johnson) सिंगल डोस कोरोना लशीला (Corona Vaccine) भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर भारतात आता कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लसींची संख्या 5 वर गेली आहे. याआधी भारतात कोविशिल्ड, (Covishield) कोव्हॅक्सिन (Covaxin), रशियाची स्पुतनिक (Sputnik V) आणि अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna) लसी वापरात आहेत. त्यात आता जॉनसन अँड जॉनसन लशीची भर पडली आहे. जॉनसन अँड जॉनसनची कोरोना लस अमेरिकेत वापरात आहे आणि या लसीचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. (Johnson & Johnson vaccine approved for use in India and 4 more vaccines awaited what is the status of vaccination in India)

काय आहे देशातली लसीकरणाची स्थिती?

भारतात मागच्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र आहे. यासोबत देशभर लसीकरणावर (Vaccination in India) भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जॉनसन अँड जॉनसनची लस वापरात आल्याने लसीकरणाला वेग मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत (7 ऑगस्ट) देशात 50.62 कोटी डोस देण्यात आलेले आहेत. एकट्या 7 तारखेला 50 लाखांहून अधिक डोस दिले गेले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18 ते 44 वयोगटातल्या 17 कोटी 54 लाख नागरिकांना पहिला डोस आणि 1 कोटी 18 लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

कधी येणार जॉनसन अँड जॉनसन लस?

जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात या लसीचा वापर किंव लसीकरण कधी सुरू होईल याबाबत अद्यात अनिश्चितता आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारसोबत बोलणी पूर्ण झाली तर सप्टेंबर महिन्यापर्यंत देशाला जॉनसन अँड जॉनसनच्या लसीचा पुरवठा सुरू होऊ शकतो.

कोरोना लसींचं उत्पादन वाढवण्यावर भर

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी संसदेत दिलेल्या उत्तरात सांगितलं की, 16 जानेवारी ते 5 ऑगस्टदरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (Serum Institute of India) राष्ट्रीय कोरोना लसीकरण योजनेसाठी कोविशिल्ड लसीचे 44.42 कोटी डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. देशात कोविशिल्ड लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोविशिल्ड लसीची मासिक उत्पादन क्षमता 11 कोटींहून 12 कोटी करण्याची योजना आखण्यात आली आहे.

आणखी चार लसी मान्यतेच्या प्रतीक्षेत

केंद्र सरकारला राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही लसींच्या 20 कोटी डोस ऑगस्टमध्ये तर 25 कोटी डोस सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात बायोलॉजिकल ई (Biological E), झायडस कॅडिला (Zydus Cadila), नोवावॅक्स (Novavax)आणि जेनोवा (Genova Vaccine) लसींना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यातल्या अनेक लसींचं उत्पादनही सुरू झालेलं आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात लसींचा मुबलक साठी तयार होऊ शकतो.

कधी पूर्ण होणार लसीकरण?

केंद्र सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी डोसचा पुरवठा करण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते. त्यात आता ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत135 कोटी डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाला अधिक वेग मिळणार आहे. केंद्र सरकारकडून 2021 च्या अखेरपर्यंत 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. पण देशातली कोरोनाची स्थिती, आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत अद्याप साशंकता आहे.

संबंधित बातम्या :

लस घेतल्यानंतर किती दिवस तुम्ही सुरक्षित राहणार?, एम्सच्या डॉक्टरांचं महत्त्वाचं उत्तर, तुम्ही वाचायलाच हवं…!

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांसाठी कोरोना लस, अदर पूनावाला यांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray Live | 2 डोस घेतल्याच्या 15 दिवसानंतर लोकल प्रवासाची मुभा : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.