ज्योती मल्होत्रा हीचा एसेट म्हणून वापर झाला, हरियाणा पोलिसांना केले मोठे दावे
पहलगाम हल्ला आणि भारत - पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाची युट्युबर ज्योती मल्होत्रा अचानक चर्चेत आली आहे. पाकिस्तानला माहीती पुरवल्या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे.

हरियाणाची युट्युबर ज्योती मल्होत्रा हीला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती हिचे पाकदुतावासातील मूळ भारतीय वंशांच्या नागरिक दानिश याच्याशी संबंध होता. तिच्या उत्पन्नापेक्षा ट्रॅव्हल व्लॉगचा खर्च जास्त होता. तरुण पिढीला काही कळत नाही कोणाकडून प्रेरणा घ्यावी, तिच्या सारख्या नागरिकांचा शत्रू राष्ट्र एसेट म्हणून वापर करतात असे हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे.
ज्योती पहलगाम हल्ल्यावेळी पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती अशी माहीती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. PIO नागरिक अनेक सोशल मिडीयावरील इनफ्लूएंसरला आकर्षीत करीत आहेत. आम्ही ज्योतीची कसून चौकशी करीत आहोत, तिच्या आर्थिक व्यवहाराची आम्ही माहिती घेत आहोत. ज्योती चीनला सुध्दा गेली होती. पहलगाम हल्ल्यावेळी ती पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योती मिलीट्री आणि पोलिसांच्या थेट संपर्कात नव्हती म्हणून जास्त माहिती काय तिच्याकडे नाही
उत्पन्नापेक्षा तिच्या ट्रॅव्हल व्लॉगचा खर्च होता, तरुण पिढीला काही समजत नाही की ते कुणाकडून प्रेरणा घेत आहेत. ती तिच्या व्लॉगच्या कंटेंटसाठी पाकिस्तानला गेली होती.पाकिस्तानचे अधिकारी तिचा एसेट म्हणून वापर करत होते. मॉर्डन वॉरफेअरमध्ये फक्त मैदानातील लढाई नसते. लढाईच्या वेळी छोटीशी माहिती सुध्दा धोकादायक ठरवू शकते. पहलगाम हल्ल्याअगोदर ती पहलगामला गेली होती, नंतर ती पाकिस्तानला गेली होती. या तिच्या लिंकबद्दल आम्ही अधिक तपास करतोय, तिच्या म्हणण्याप्रमाणे काहीजण पाकिस्तानींना मदत करत होते. त्याचाही तपास आम्ही करीत आहोत असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
आमच्याकडे थेट पुरावे नाहीत.
सोशलायजेशनची परवानगी असते मात्र, पाकिस्तान हा आपल्यासाठी साधारण देश नाही. त्यांची मानसिकता आपल्याला कळाली पाहिजे, युध्दाच्यावेळी त्यांच्यासोबत संपर्कात राहण योग्य नाही. आमच्याकडे थेट पुरावे नाहीत. कारण तिच्याकडे सुरक्षेसंदर्भात महत्वाची माहिती नव्हती. मात्र PIO सोबत लढाईच्यावेळी संपर्कात राहण योग्य नाही. पाकिस्तान दौऱ्या दरम्यान ही पाकिस्तानातील काही मोठ्या लोकांसोबत संपर्कात आली होती. पाकिस्तानकडून सॉफ्ट पॉवरचा वापर करून, आपल्या विरोधात लोकांना तयार करण सुरु असतं. हीच्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.आम्ही तिच्या व्हिडीओचे एनालाईज करत आहोत असेही या अधिकाऱ्याने सांगितले.