Rajya Sabha elections: काँग्रेसचं काही खरं नाही, आता कपिल सिब्बलांनीच हात सोडला, सपाकडून राज्यसभा उमेदवारी

Rajya Sabha elections: काँग्रेसचं काही खरं नाही, आता कपिल सिब्बलांनीच हात सोडला, सपाकडून राज्यसभा उमेदवारी
कपिल सिब्बल
Image Credit source: tv9

सपाचे 125 आमदार आहेत. त्यांना 3 जागा जिंकण्यात काहीच अडचण नाही, मात्र 11व्या जागेसाठी भाजप आणि सपा यांच्यात राजकीय कुरघोडी होणार असून मतांसाठी घोडेबजार होऊ शकते.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

| Edited By: सागर जोशी

May 25, 2022 | 1:48 PM

नवी दिल्ली : 2022 हे वर्ष काही काँग्रेसच्या वाट्याला चांगले आलेले दिसत नाही. काँग्रेसाला उतरती कळा लागली असतानाच अनेक दिग्गज नेते काँग्रेला सोडून जात आहेत. ते काँग्रेस (Congress)पक्षाला रामराम ठोकत आहेत. आधी ज्योतिरादित्य सिंधीया यांनी पक्ष सोडला त्यानंतर ही गळती काही केल्या थांबत नाही असेच चित्र सध्या काँग्रेसमध्ये दिसत आहे. तर त्यानंतर काँग्रेसला हार्दिक पटेल यांनी झटका दिला होता. तर त्यांचा पाठोपाठ पंजाबमधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी आपण सोडत असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Party) जाण्याचा निर्णय घेतला आहे. सिब्बल यांनी सपाच्या तिकिटावर राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. सिब्बल यांनी बुधवारी लखनऊमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सिब्बल यांच्या नामांकनावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादवही उपस्थित होते.

आझम यांची नाराजी दूर

2016 मध्ये, सिब्बल हे तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेसचे उमेदवार म्हणून यूपीमधून राज्यसभेवर निवडून आले. कपिल सिब्बल यांच्याबाबत असेही मानले जाते की, आझम खान यांची उपेक्षा आणि रिलीजनंतरचा हावभाव यांच्यातील या संधीचा फायदा अखिलेश यांना करायचा आहे. माझ्या विध्वंसात माझ्या प्रियजनांचा हात असल्याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आझम खान म्हणाले. सपाच्या मदतीने सिब्बल राज्यसभेवर गेले तर आझम यांची नाराजी दूर करण्यासाठी ते निश्चितच प्रभावी पाऊल ठरू शकते, असे बोलले जात होते. यासोबतच समाजवादी पक्षाला मोठा नेता आणि कायदेशीर सल्लागारही मिळेल.

अकराव्या जागेवरून वाद!

उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 आमदार आहेत, त्यापैकी 2 जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे सध्या 401 आमदार आहेत. अशा स्थितीत एका जागेसाठी 36 आमदारांचे मत आवश्यक आहे. भाजप आघाडीकडे 273 आमदार आहेत, अशा परिस्थितीत 7 जागा जिंकण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सपाचे 125 आमदार आहेत. त्यांना 3 जागा जिंकण्यात काहीच अडचण नाही, मात्र 11व्या जागेसाठी भाजप आणि सपा यांच्यात राजकीय कुरघोडी होणार असून मतांसाठी घोडेबजार होऊ शकते.

मात्र भाजप आणि सपाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पाहावे लागेल. कारण त्यानंतरच पुढील चित्र ठरणार आहे. राजा भैय्या यांचा पक्ष जनसत्ता दल लोकतांत्रिककडे दोन, काँग्रेसकडे दोन, बसपाकडे एक आमदार आहे. भाजपला जनसत्ता दलाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो. कोणत्याही पक्षाशी युती नसल्याने काँग्रेस आणि बसपा मतदान करण्यास मोकळीक आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या राज्यसभेत सपाचे पाच सदस्य

राज्यसभेच्या 11 जागांसाठी 24 मे पासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. समाजवादी पक्ष सध्या तीन जणांना राज्यसभेवर पाठवण्याच्या स्थितीत आहे. राज्यसभेत आतापर्यंत सपाचे पाच सदस्य आहेत. यामध्ये कुंवर रेवती रमण सिंह, विशंबर प्रसाद निषाद आणि चौधरी सुखराम सिंह यादव यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें