AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा फैसला उद्या होणार; खर्गे घेणार सोनिया-राहुल गांधी यांचा सल्ला

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा सल्ला घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्री पदाची उद्या घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा फैसला उद्या होणार; खर्गे घेणार सोनिया-राहुल गांधी यांचा सल्ला
| Updated on: May 16, 2023 | 11:41 PM
Share

बेंगळुरू : कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी कोण बसणार याची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे आता दोनचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत. दोन्ही नेत्यांकडून अजूनही कोणतीही स्पष्ट वक्तव्ये समोर आली नाहीत. मात्र या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीप्रमाणे, आजही मुख्यमंत्र्यांच्या नावाविषयी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खर्गे यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी वाटले जात असेल,

तर त्यांना आधी आपल्याला मुख्यमंत्री बनवले तर मी कर्नाटकच्या जनतेला दिलेली अश्वासनं पूर्ण करु शकणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सिद्धरामय्या यांनी खर्गे यांना सांगितले आहे तर पक्षाच्या अनेक आमदारांना त्यांनाच मुख्यमंत्री बनवायचे आहे असंही त्यांनी खर्गेना बोलताना सांगितले.

सिद्धरामय्यांनी सांगितले की, मला आमदारांचा जास्त पाठिंबा असल्याने त्यांच्या मतांचा आपण आदर केला पाहिजे अशी भावना त्यांनी खर्गे यांच्याजवळ व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी दलित, अल्पसंख्याक आणि मागास समाजातील दाखला देत त्यांचा चेहरा पाहूनच अहिंदा समाजाने काँग्रेसला मतदान करून ऐतिहासिक विजय मिळवला असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तर डीके शिवकुमार यांनी सांगितले की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सुरू ठेवावा.तसेच आपण सोनिया गांधींना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसलाच विजयी करू असं आश्वासन दिले होते आणि त्यांनी दिलेले वचन पाळले असल्याचे सांगत खर्गे यांनी याप्रकरणी सोनिया गांधींशी बोलण्यासही सांगितले आहे.

या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र यादरम्यान ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा सल्ला घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्री पदाची उद्या घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही घोषणा बंगळुरू किंवा दिल्लीत केली जाईल याबाबत मात्र उत्सुकता लागुन राहिली आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.